कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने सोमवारपासून १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झालं आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी ही माहिती दिली आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी एक बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल की लॉकडाऊन कधीापासून सुरू करायचा. या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त असणार आहेत. त्यांच्या बैठकीत लॉकडाऊन कधीपासून सुरू करायचा ते निश्चित करण्यात येईल.

अमरावतीतल्या कोरोना रूग्णवाढीमागे विमा कंपन्या-दवाखान्यांचं रॅकेट?

औरंगाबाद महापालिका आयुक्तांनी सांगितलं येत्या आठवड्यातच लॉकडाऊन लागेल. त्यासंदर्भातली तारीख उद्या ठरणार आहे असंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये मार्च महिन्यात रूग्ण वाढत गेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये कोणत्या तारखेला किती रूग्ण?

१ मार्च २२५ रुग्ण

ADVERTISEMENT

२ मार्च ३२५

ADVERTISEMENT

३ मार्च ३७१

४ मार्च २५७

५ मार्च ४५९

पाच दिवसात औरंगाबादमध्ये एवढे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे १० दिवसांचा लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT