दहीहंडीत जखमी झालेल्या उपचारादरम्यान गोविंदाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला केली १० लाखांची मदत

मुंबई तक

दहीहंडी स्पर्धेत सातव्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या 26 वर्षीय संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर झालीय. आमदार दिलीप लांडे स्वतः 10 लाखांचा धनादेश घेऊन दळवींच्या कुटुंबियांना देणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ही मदत जाहीर केली. याआधी सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं होतं. सायंकाळी विधान भवन परिसरात आमदार लांडे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दहीहंडी स्पर्धेत सातव्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या 26 वर्षीय संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर झालीय. आमदार दिलीप लांडे स्वतः 10 लाखांचा धनादेश घेऊन दळवींच्या कुटुंबियांना देणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ही मदत जाहीर केली. याआधी सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं होतं. सायंकाळी विधान भवन परिसरात आमदार लांडे यांनी 10 लाखांचा धनादेश दाखवत आपण संदेश दळवी याच्या कुटूंबियांना देणार असल्याचं सांगितलं.

सातव्या थरावरून पडलेल्या संदेशचा उपचारादरम्यान मृत्यू

विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश सातव्या थरावरुन खाली कोसळला. त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मुंबईतील नानावटी रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. 7व्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संदेश आपल्या आई-वडील आणि भावंडांसह कुर्ल्याला राहत होता. अवघ्या 26 वर्षात त्याचं निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

यंदा निर्बंधमुक्त उत्सव

हे वाचलं का?

    follow whatsapp