महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 237 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 567 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 79 हजार 746 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.7 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 107 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 237 कोरोना बाधित […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 567 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 79 हजार 746 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.7 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 107 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 237 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.94 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 86 लाख 41 हजार 639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 34 हजार 880 नमुने पॉझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 78 हजार 781 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 5 हजार 401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 36 हजार 661 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 10 हजार 107 नव्या रूग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 59 लाख 34 हजार 880 इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 999 ने वाढली आहे. हे 999 मृत्यू, नाशिक-240, पुणे-135, अहमदनगर-129, नागपूर-94, सातारा-81, ठाणे-49, सांगली-28, लातूर-24, जळगाव-23, बीड-22, कोल्हापूर-22, रत्नागिरी-19, नांदेड-17, परभणी-15, औरंगाबाद-14, भंडारा-14, हिंगोली-11, अकोला-9, बुलढाणा-8, पालघर-8, रायगड-8, वाशिम-8, चंद्रपूर-7, उस्मानाबाद-6, नंदूरबार-3, वर्धा-2, गडचिरोली-1, जालना-1 आणि यवतमाळ-1 असे आहेत.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील 10 हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या असलेले जिल्हे
मुंबई – 17782
ADVERTISEMENT
ठाणे-14170
ADVERTISEMENT
पुणे- 17820
सांगली-10900
कोल्हापूर- 12487
महाराष्ट्रातले पाच जिल्हे अजूनही असे आहेत जिथे सक्रिय रूग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. राज्यात 20 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आला आहे. तरीही सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे असंही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT