Winter session : शिवसेनेच्या अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदींसह राज्यसभेचे 12 खासदार निलंबित
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. देशभरात चर्चेत असलेल्या मुद्द्यांबरोबरच सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं आधीच बोललं जात होतं. मात्र, पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनातील गदारोळाचे पडसाद उमटले. पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे, विमा विधेयक आणि पेगासस प्रकरणावरून गोंधळ घालणाऱ्या 12 खासदारांना सभापतींनी निलंबित केलं. या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदींसह […]
ADVERTISEMENT

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. देशभरात चर्चेत असलेल्या मुद्द्यांबरोबरच सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं आधीच बोललं जात होतं. मात्र, पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनातील गदारोळाचे पडसाद उमटले. पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे, विमा विधेयक आणि पेगासस प्रकरणावरून गोंधळ घालणाऱ्या 12 खासदारांना सभापतींनी निलंबित केलं. या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदींसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय खासदारांचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायद्यांसह विमा विधेयक, पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विशेषतः राज्यसभेत यांचे तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी राज्यसभेत सरकारला लक्ष्य करत प्रचंड गदारोळ घातला होता.
सभागृहातील बाकांवर चढून जोरजोरात घोषणाबाजीही केली होती. विधेयकाच्या प्रती भिरकावून लावत सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला होता. त्यामुळे सभापतींना काही वेळा कामकाज तहकूब करावं लागलंं. त्याचबरोबर दोन दिवस आधीच अधिवेशन गुंडाळण्यात आलं होतं.
या प्रकरणी 12 खासदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा ठपका ठेवत राज्यसभा सभापतींनी निलंबित केलं. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई यांच्यासह 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात शिवसेनेसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआयच्या खासदारांचा समावेश आहे.