कबड्डीपटूची हत्या : “ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं”
पुण्यात मन विषण्ण करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने 14 वर्षाच्या क्षितिजाचं आयुष्यचं हिरावून घेतलं. कबड्डी खेळत असताना आरोपीने क्षितिजावर कोयत्याने वार केले आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच ती गतप्राण झाली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेचे वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आरोपीला क्षितिजा भावासारखं समजायची, अशी माहिती तिचे […]
ADVERTISEMENT

पुण्यात मन विषण्ण करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने 14 वर्षाच्या क्षितिजाचं आयुष्यचं हिरावून घेतलं. कबड्डी खेळत असताना आरोपीने क्षितिजावर कोयत्याने वार केले आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच ती गतप्राण झाली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेचे वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आरोपीला क्षितिजा भावासारखं समजायची, अशी माहिती तिचे मामा अमोल शिंदे यांनी दिली. हे सांगतानाच शिंदे यांनी सरकारकडे लवकरात लवकर न्याय देण्याची कळकळीची विनंती केली आहे.
‘ती माझी भाची होती. माझं म्हणणं एव्हढच आहे की, यामागे कुणीतरी मोठा सूत्रधार आहे. मोठा सुत्रधार असल्याशिवाय कोणताही गुन्हेगार एवढा मोठा गुन्हा करू शकत नाही. शासनाला माझी विनंती आहे की, असे प्रकार सारखे होत राहिले तर आम्ही करायचं काय? इतरांनी काय करायचं?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणे : मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीये; अजित पवारांना संताप अनावर