अमरनाथमधे ढगफुटी, १५ भाविकांचा मृत्यू ४० जण बेपत्ता; मदत आणि बचावकार्य सुरू
जम्मू काश्मीरजवळच्या अमरनाथ या ठिकाणी शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यानंतर जो जलप्रलय आला त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. तसंच ४० जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथकं पोहचली आहेत. रात्रभर बचाव कार्य सुरू होतंच आता शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरू झालं आहे. #WATCH […]
ADVERTISEMENT
जम्मू काश्मीरजवळच्या अमरनाथ या ठिकाणी शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यानंतर जो जलप्रलय आला त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. तसंच ४० जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथकं पोहचली आहेत. रात्रभर बचाव कार्य सुरू होतंच आता शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरू झालं आहे.
ADVERTISEMENT
#WATCH | Indian Army continues rescue operation in cloudburst affected area at the lower Amarnath Cave site
(Source: Indian Army) pic.twitter.com/0mQt4L7tTr
— ANI (@ANI) July 9, 2022
ढगफुटीनंतर (Cloudburst in Amarnath) १५ जणांचा मृत्यू तर ३५ जण बेपत्ता
ढगफुटी झाली आणि त्यानंतर जो जलप्रलय झाला त्यामुळे या भागात असलेले तंबू वाहून गेले. ज्यामध्ये १५ भाविकांचा मृत्यू झाला. तर ३५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सातत्याने घेतला जातो आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे वाचलं का?
Jammu and Kashmir | Visuals from Sonamarg's Baltal base camp as Amarnath Yatra remains temporarily suspended
“We have been told to stay in tents here for today as the weather there (Amarnath cave) is not clear,” says a pilgrim#AmarnathCaveCloudBurst pic.twitter.com/NJz5Ok43cw
— ANI (@ANI) July 9, 2022
आयटीबीपी पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागात अद्यापही पाऊस पडतो आहेच. तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून जे भाविक त्या भागात नाहीत त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. अमरनाथ गुफा ज्या भागात आहे त्याच्या जवळचही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांना एअरलिफ्ट केलं जातं आहे.
सोनमर्ग या ठिकाणी असलेल्या बेस कँपवरून लोकांना परत पाठवलं जातं आहे. आम्हाला हे सांगण्यात आलं आहे की वातावरण अत्यंत खराब आहे, ढगफुटीसारखी घटना पुन्हा घडू शकते त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं आहे असं एका भाविकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
या ठिकाणी लष्कराचं हेलिकॉप्टर आणलं गेलं आहे. त्या हेलिकॉप्टरने जखमी प्रवाशांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी धाडलं जातं आहे. शुक्रवारी संध्याकाळी जी घटना घडली त्या घटनेत ढगफुटी झाल्याने ३५ जणांचा मृत्यू झाला. तर ढगफुटीमुळे आलेल्या पुरात ४० जण बेपत्ता झाले आहेत. तसंच ४५ लोक जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
शुक्रवारी संध्याकाळी जी घटना घडली त्यामध्ये सुमारे ४५ जण जखमी झाले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी आणलं जातं आहे. आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथकं ही या ठिकाणी युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य करत आहेत.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी प्राथमिक माहिती देताना म्हटले होते की, ढगफुटीमुळे गुंफेच्या पायथ्यानजीकच्या यात्रातळावरील काही लंगर आणि तंबू यांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या पंधरावर पोहोचली होती. पहलगाम पोलीस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले की, मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT