कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही 17 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही अमरावतीतले 17 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सगळ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा निर्बंध लादण्याबाबत ठाकरे सरकार गंभीर आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाडत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही अमरावतीतले 17 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सगळ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा निर्बंध लादण्याबाबत ठाकरे सरकार गंभीर आहे.

अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाडत असल्याचं आढळून आलं आहे. 1 फेब्रुवारीपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या या तिन्ही शहरांमध्ये वाढू लागली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मुंबईपेक्षा जास्त प्रमाणात या तीन शहरांमध्ये रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तिन्ही शहरांबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अकोल्यात काय काय निर्बंध लावण्यात आले आहेत?

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही