Taukte वादळाच्या तडाख्यात समुद्रात अडकलेल्या 77 जणांचा शोध सुरू, 184 जणांना नौदलाने वाचवलं
भारतीय नौदलाकडून समुद्रात अडकलेल्या 184 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नौदलाच्या INS कोचीने ही सुटका केली आहे. काही वेळापूर्वी 184 जणांना वाचवण्यात आलं आहे. या खलाशांनी सुमारे 12 ते 14 तास समुद्रातील पाण्याशी, लाटांशी झुंज दिली. आज आयएनस कोचीने 125 जणांना वाचवलं आहे. इतर 61 जणांना इतर जहाजांवर आणून वाचवण्यात आलं आहे. शोध मोहीम अद्यापही […]
ADVERTISEMENT
भारतीय नौदलाकडून समुद्रात अडकलेल्या 184 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नौदलाच्या INS कोचीने ही सुटका केली आहे. काही वेळापूर्वी 184 जणांना वाचवण्यात आलं आहे. या खलाशांनी सुमारे 12 ते 14 तास समुद्रातील पाण्याशी, लाटांशी झुंज दिली. आज आयएनस कोचीने 125 जणांना वाचवलं आहे. इतर 61 जणांना इतर जहाजांवर आणून वाचवण्यात आलं आहे. शोध मोहीम अद्यापही जारी आहे असंही आयएनस कोचीचे कॅप्टन यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
INS कोची आणि इतर जहाजांच्या मदतीने शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. तौकताई चक्रीवादळ येण्याचा इशारा होता तरीही या बार्ज समुद्रात होत्या. या बार्जवरच्या खलाशांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. या सगळ्यांना वाचवण्यासाठी तट रक्षक दल आणि नौदलाकडून प्रयत्नांची शर्थ केली जाते आहे.
Tauktae Cyclone : नौदलाच्या रुपात जेव्हा देवच समोर येतो
हे वाचलं का?
AFCONS या ONGC साठी काम करणाऱ्या कंपनीने जारी केलं पत्रक
AFCONS या ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंपनीने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आमची कंपनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काम करते आहे. गेल्या पाच दशकातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ आम्ही पाहिलं आहे या चक्रीवादळात Pappa 305 अर्थात P 305 ही बार्ज बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. चार्टर्ड बार्ज P 305 M/s Durmast Enterprises Limited यांचं होतं तेथील क्रू मेंबर आणि खलाशीही याच कंपनीचे होते. सोमवारी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि समुद्र खवळला तेव्हा P 305 मध्ये 261 जण होते.
ADVERTISEMENT
या सगळ्यांनी बार्ज बुडण्यापूर्वी लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षासंबंधी उपकरणं घालून समुद्रात उड्या मारल्या. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांनी P 305 मधील 182 जणांची सुखरूप सुटका केली आहे. जे कर्मचारी बेपत्ता आहेत त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी नौदल आणि भारतीय तटरक्षक दल झटतं आहे. बाधित झालेल्या इतर बार्जवरचे कर्मचारी सुखरूप आहेत. जे कर्मचारी समुद्रात बेपत्ता झाले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती कठीण आहे.. मात्र आमच्या सद्भवना आणि प्रार्थना या त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT