19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

girl sexually harassed 15 year old boy : देशभरात दररोज बलात्काराच्या (Rape case) अनेक घटना घडत असतात. या घटनांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा लैंगिक छळ (sexual harassment) केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 19 वर्षाच्या तरूणीने अल्पवयीन तरूणासोबत जबरदस्ती शारीरीक संबंध ठेवत त्याचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेतील तरूणीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पॉस्को (Posco Act) कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच एका मुलीवर गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. (19 year old girl sexually harassed 15 year old boy court pronounced 10 year imprisonment madhay pradesh)

ADVERTISEMENT

घराशेजारून मुलगा बेपत्ता

3 नोव्हेंबर 2018 रोजी अल्पवयीन मुलगा घराच्या जवळून बेपत्ता झाला होता. खुप शोधा शोध करून सुद्धा हा मुलगा सापडला नव्हता. त्यामुळे मुलाच्या आईने पोलिसात (Police) तक्रार दिली होती. या तक्रारीत तिने मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. माझा 15 वर्षाचा मुलगा खीरसाठी दुध आणायला दुकानात गेला होता. मात्र तो परतलाच नाही. त्यामु्ळे मला संशय आहे की अज्ञात व्यक्तीने त्याला आमिष दाखवून आपल्यासोबत नेले असावा.

पिशवीमध्ये महिलेच्या कंबरेखालचा भाग, खोपडी आणि हात.. खुनाची खळबळजनक घटना

हे वाचलं का?

मुलाचा धक्कादायक गौप्यस्फोट

आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाचा शोध सूरू केला होता. अखेर पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आले. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात अल्पवयीन मुलाने धक्कादायक खुलासे केले. राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षाच्या तरूणीने मला आमिष दाखवून गुजरातला नेले होते. गुजरातमध्ये तिने मला एका टाईल्स फॅक्टरीत कामाला लावले. या दरम्यान मी तिच्यासोबत घरी राहायचो. या काळात तिने मला शारीरीक संबंध (sexual harassment) ठेवायला जबरदस्ती केली होती, असा धक्कादायक जबाब त्याने दिला होता.

Crime : लाखात पगार, घरी सुरळीत…; तरीही उच्चशिक्षित तरुणानं संपवलं आयुष्य

ADVERTISEMENT

पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत तरूणीचा शोध घेत तिच्या विरोधात पॉस्को कायद्यानुसार (Posco Act) गुन्हा दाखल केला. यानंतर तिला स्पेशल कोर्टातही हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला 10 वर्षाची जेल आणि 3000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येक घटनेत गरजेचे नाही आहे की एखादा पुरूषच आरोपी असेल, कधी कधी महिला देखील असू शकते, असे मत कोर्टाने शिक्षा सुनावताना नोंदवले होते.

ADVERTISEMENT

‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये ही घटना घडलीय. या घटनेच पॉस्को कायद्यात पहिल्यांदाच एका तरूणीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेची संपुर्ण राज्यभर चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT