पुणे : दोन महिलांचा एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा आरोप
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहितेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने हा बलात्कार केला. पीडितेने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्काराच्या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेही पीडित महिलेच्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. दोन्ही महिलांनी एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा […]
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहितेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने हा बलात्कार केला. पीडितेने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्काराच्या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेही पीडित महिलेच्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. दोन्ही महिलांनी एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.
ADVERTISEMENT
याबाबत २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे की, आरोपी अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे हे पीडितेच्या पतीला १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शिरवळ येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले होते. यादरम्यान फिर्यादी महिला शेतात जात असताना आरोपीने तिला अडवून पतीने मोबाईल चार्जर व पँट देण्यास सांगितल्याची बतावणी केली. महिलेने या वस्तू देण्यास नकार दिल्याने आरोपीने महिलेवर गोठ्यात नेऊन बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराच्या कलमांसह अन्य कलमाअंतर्गत तीन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई : धक्कादायक, माहेरी गेलेल्या पत्नीवर भररस्त्यात वार करत पतीने केली हत्या
हे वाचलं का?
हा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, आरोपीच्या पत्नीनेही पहिल्या प्रकरणातील पीडित महिलेच्या पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिलेच्या पतीने आपल्यावर लॉजमध्ये बलात्कार केल्याची तक्रार आरोपीच्या पत्नीने केली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, या दोन्ही महिलांनी एकमेकांच्या पतीविरोधात बलात्काराच्या तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात सखोल चौकशी केल्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलू शकते.
पिंपरी-चिंचवड : उधार न दिल्यामुळे ग्राहकाकडून बेकरीची तोडफोड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT