नागपूर : ‘त्या’ झाडाखाली गजानन महाराजांचं वास्तव्य, पिंपळाचं झाड तोडण्यास स्थानिकांचा विरोध वाढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– नागपूरवरुन योगेश पांडे आणि बुलढाण्यावरुन ज़का खान, मुंबई तक प्रतिनिधी

ADVERTISEMENT

नागपूरच्या सीताबर्डी भागात २०८ वर्षांपासून असलेल्या पिंपळाच्या झाडाला वाचवण्यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम सुरु केली आहे. आता या मोहीमेत काही स्थानिक नागरिकही सहभागी झाले आहेत. परंतू पिंपळाचं झाड वाचवण्याच्या या मोहीमेला आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. या झाडाखाली शेगावचे प्रसिद्ध संत गजानन महाराज यांचं वास्तव्य असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे हे झाडं आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान असून ते तोडण्यासाठी स्थानिकांनी विरोध केला आहे.

याबद्दल मुंबई तकने सीताबर्डी भागात जाऊन स्थानिकांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. स्थानिक व्यक्तींनी केलेल्या दाव्यानुसार या भागात शेगावचे संत गजानन महाराज यांचं वास्तव्य असायचं. नागपुरातील सिताबर्डी भागात गोपाळराव बुटी यांचा वाडा होता. गोपाळरावांनी १९०८ च्या दरम्यान गजानन महाराजांना नागपुरात वास्तव्यासाठी बोलावलं होतं. यावेळी गजानन महाराज बुटी यांच्या वाड्याशेजारी असलेल्या परिसरात भ्रमण करायचे. याच पिंपळाच्या झाडाखाली बसून महाराज अनेकदा बसायचे असंही इथल्या स्थानिक व्यक्तींनी सांगितलं.

हे वाचलं का?

याबद्दल खात्री करण्यासाठी मुंबई तक ने संत गजानन महाराज यांच्यावर अनेक ग्रंथ लिहीणाऱ्या दास भार्गव येवदेकर यांच्यासी संपर्क साधला. त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. गजानन महाराज नागपूरला वास्तव्यासाठी असताना ते गोपाळराव बुटींच्या वाड्यात वास्तव्यासाठी होते अशी प्रतिक्रीया दास भार्गव येवदेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ग्रंथांमध्ये लेखनही झाल्याचं येवदेकर यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

“नागपूरला वास्तव्य असताना महाराज गोपाळराव बुटींच्या वाड्यात थांबायचे. त्या वाड्याशेजारीच हे झाड आहे. झाड हे तोडूच नये. ते ऐतिहासीक झाड आहे. आजकाल एवढी वृक्षतोड सुरु आहे ते पाहता हे झाड तोडलं जाऊ नये. झाडं लावा झाडं जगवा असं सरकारचं आपल्याला सांगत असतं. विकासाच्या नावाखाली हे झाडं तोडलं जाणं योग्य नाही. इतक्या वर्षांचं साक्षीदार आहे हे झाडं, नागपूरचा इतिहास या झाडाने पाहिला आहे. महाराज त्या भागात वावरले, तिकडे ते बसायचे त्यामुळे ते झाड तोडणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रीया येवदेकर यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान नागपूरच्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या कौत्तुभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्बन ट्री कायदा १९७५ नुसार ५० वर्षांवरील प्रत्येक झाडं हे हेरिटेजच्या श्रेणीत येते . या झाडाचे वय हे २०८ वर्षे इतके जुने आहे. त्यामुळे हे झाड तोडायचं असेल तर त्या झाडाच्या वया इतकी झाडं लावणं गरजेचं आहे. आता नागपुरात अशी किती जागा राहिली आहे की महापालिका तिकडे २०८ झाडं लावणार आहे. त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा मेळ साधून गोष्टी केल्या जाव्यात अशी मागणी चॅटर्जी यांनी केली आहे.

नागपुरातील सीताबर्डी परिसरातील 208 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाला तोडण्यासाठी जागा मालकाने नागपूर महानगरपालिका उद्यान विभागात अर्ज दाखल केला त्यानंतर महापालिकेने वर्तमानपत्र मध्ये हे झाड कापण्यासाठी आक्षेप आणि हरकती मागविण्याला, यानंतर या झाडाला वाचविण्यासाठी सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक पुढे आले आहे. त्यामुळे या झाडाबद्दल नेमका कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT