धक्कादायक.. लग्न घरी आलेल्या काकीवर 22 वर्षीय वासनांध पुतण्याकडून बलात्कार

मुंबई तक

प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर पुतण्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर पुतण्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या निमित्ताने गेली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पीडित महिलेचा पुतण्या हा तिच्या (चुलतीकडे) घराजवळ आला.

पीडित चुलतीला त्याने आवाज देऊन सांगितले की, नाना (पीडित महिलेचा पती) दारू पिऊन पडला आहे. माझ्यासोबत चल तुला दाखवतो, कुठे आहे ते. महिलेने पुतण्यावर विश्‍वास ठेवला आणि ती देखील त्याच्यासोबत गेली. यावेळी अंधार असल्याने त्याने महिलेला नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले आणि तिचे तोंड दाबून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एवढंच नव्हे तर यानंतर वासनांध पुतण्याने आपल्याच चुलतीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच बलात्काराविषयी कोणालाही सांगितले तर जीवे ठार मारू अशी धमकी त्याने तिला दिली.

हे वाचलं का?