Dombivali: बहुमजली इमारतीत राहणाऱ्या 240 कुटुंबांना शाळेत काढावी लागली रात्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Big crack of the Building : डोंबिवलीतील (Dombivali) शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका इमारतीला (Building) भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीमधील रहिवाशांना जोरदार आवाज ऐकू आला त्यामुळे तात्काळ इमारतीमधील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. शांती उपवन (Shanti Upvan) हा कॉम्प्लेक्स सुमारे 22 वर्षे जुना आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये 240 कुटुंब राहतात. तर तडा गेलेल्या विंग मध्ये 42 कुटुंब राहत होते. सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले. immediately the residents of the building rushed out

अमरावती शहरातील दुमजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी

अचानक झालेल्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या इमारतींमधील कुटुंबांना परिसरातील शाळा व समाज मंदिराच्या हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्याचबरोबर सदर इमारत निष्कासित करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. अनेकवेळा इमारत जुनी असून धोकादायक बनू शकते, अशी तक्रार रहिवाशी संबंधित बिल्डर आणि पालिकेकडे करत होते. तात्काळ आम्हाला पर्यायी जागा देऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी इमारतीतील नागरिक करीत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कॉम्प्लेक्समधील एफ विंगमध्ये जोरदार आवाज झाला

डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात शांती उपवन कॉम्प्लेक्समध्ये एकूण पाच विंग आहेत. हे कॉम्प्लेक्स 22 वर्ष जुने आहे. या कॉम्प्लेक्समध्ये एकूण 240 कुटुंब राहतात. शनिवारी रात्रीच्या सुमारास या कॉम्प्लेक्समधील एफ विंग मध्ये जोरदार आवाज झाला. काही घरांमध्ये माती देखील पडली. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी इमारती बाहेर पळ काढला. काही क्षणातच इमारतीला भला मोठा तडा गेल्याचं रहिवाशांना दिसून आलं. याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

42 कुटुंबांना सुखरूप घराबाहेर काढलं

अग्निशमन विभाग व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला तडा गेलेल्या या इमारतीमधील 42 कुटुंबांना सुखरूप घराबाहेर काढलं. त्यानंतर इमारत धोकादायक झाल्याने या कॉम्प्लेक्समधील सर्वच विंगमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत निष्कासित करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

ADVERTISEMENT

मुंबई : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली, घटनेचा व्हिडीओ आला समोर

ADVERTISEMENT

बिल्डरने दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप

दरम्यान इमारती मधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या शाळा व समाज मंदिर हॉल मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत पुनर्बांधणी करण्यासाठी संबधित बिल्डरकडे वारंवार मागणी केली. मात्र संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT