धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुणे शहर परिसरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील पाटस गावात एकाच घरातील तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भावांची नावं मुरलीधर रंधवे, विठ्ठल रंधवे आणि काशिनाथ रंधवे अशी आहेत.

ADVERTISEMENT

स्थानिक आरोग्य यंत्रणेतील डॉ. बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंधवे कुटुंबातील एक व्यक्ती पुण्याला काही कामानिमीत्त गेला होता. हा व्यक्ती पुण्यात आला असताना त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर रंधवे कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली. यानंतर सर्व रुग्णांवर उपचार सुरु झाले. दुर्वैवाने यातील तिन्ही भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बारामती तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या गर्दीमुळे बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, यानंतर प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

हे वाचलं का?

आतापर्यंत बारामती तालुक्यात 6 हजार 742 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 146 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाची चाचणी पॉझिटिव आल्यास होम कोरंटाईन न करता सरकारी सेंटरमध्ये को कोरंटाईन व्हावे लागणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी मुंबई तक ला दिली. याशिवाय सीआरपीएफच्या नऊ जवानांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर तालुक्यात देखील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT