homepage_banner

परभणी : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन भावांचा मृत्यू, जिंतूर-जालना महामार्गावरील घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहराजवळ ३ किमी अंतरावर असलेल्या अकोली गावाजवळील पुलावर एका ट्रकने मोटर सायकलला चिरडल्याने तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजल्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयतात मालेगावातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असून तिसरा मयत चुलतभाऊ असल्याचं कळतंय. या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावातील मेहेत्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी तिन्ही भावांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह व त्याच्या शेजारी जेवणाचे डब्बे हे दृष्य मन सुन्न करणारं होतं.

गुजरातहून पुण्यात येणारा तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त, आळेफाटा पोलिसांची धाडसी कारवाई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील अभिषेक काशिनाथ मेहेत्रे, योगेश काशिनाथ मेहेत्रे हे सख्खे भाऊ व त्यांचा तिसरा चुलत भाऊ रामा विश्वनाथ मेहेत्रे हे नेहमी प्रमाणे मालेगाव वरुन जिंतूरकडे मसाल्याच्या दुकानावर आपल्या कामानिमीत्त जात होते. आपल्या दुचाकीवरुन जात असताना अकोली पुलाजवळ जिंतूरवरुन जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने मेहेत्रे भावांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आग, जिवीतहानी नाही

ADVERTISEMENT

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. तिन्ही भावांच्या डोक्याचा या अपघातात चेंदामेंदा झाला होता. या अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, एपीआय गंगाधर गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी साठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

ADVERTISEMENT

सांगली : उसतोडणी मशिनला आग लागून दीड कोटींचं नुकसान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT