चुकीला माफी नाही ! पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आईने मुलाला धाडलं तुरुंगात
आपलं मुल कितीही मोठं झालेलं असून दे आई नेहमी त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते. जसं लहानपणी एखादी चुक झाल्यानंतर पाठीत धपाटा घालणारी आई मोठे झाल्यावर एखादी चूक झाल्यानंतर मुलाला चांगलीच अद्दल घडवायला मागेपुढे पाहत नाही. मुंबईत एका ६० वर्षीय महिलेने आपल्या आईपणाची खरी ओळख दाखवून दिली आहे. आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या स्वतःच्या मुलाला या […]
ADVERTISEMENT
आपलं मुल कितीही मोठं झालेलं असून दे आई नेहमी त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते. जसं लहानपणी एखादी चुक झाल्यानंतर पाठीत धपाटा घालणारी आई मोठे झाल्यावर एखादी चूक झाल्यानंतर मुलाला चांगलीच अद्दल घडवायला मागेपुढे पाहत नाही. मुंबईत एका ६० वर्षीय महिलेने आपल्या आईपणाची खरी ओळख दाखवून दिली आहे. आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या स्वतःच्या मुलाला या आईने कोर्टात साक्ष देऊन तुरुंगात धाडलं आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीत मुंबईतील विशेष POCSO न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टानेही या ६० वर्षीय महिलेने दाखवलेल्या धाडसाबद्दल तिचं कौतुक केलं.
या घटनेत पीडित मुलीच्या आजीने दाखवलेल्या धा़डसाचं कौतुक करायला हवं. जरीही या वयात त्यांना या लहान मुलीची जबाबदारी घ्यावी लागणार आहे तरीही त्यांनी सत्याची साथ सोडली नाही अशा शब्दांत कोर्टाने या महिलेचं कौतुक केलं. “वडील हे मुलीसाठी सुरक्षा, विश्वास आणि प्रेम या तीन गुणांवर आधारीत एक वातावरण तयार करतात. आपल्या मुलीचं आयुष्य सुखकर व्हावं आणि तिचा भविष्यात कसलाही त्रास होऊ नये ही जबाबदारी वडिलांची असते. परंतू इथे पीडित मुलीला तिच्या वडिलांमुळेत यातना सोसाव्या लागल्या आहेत. यामुळे पीडित मुलीच्या पुढील आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. POCSO कायद्याअंतर्गत विविध संस्थांच्या मदतीने पीडित मुलगी यातून स्वतःला सावरेल अशी कोर्टाला आशा आहे”, असं मत न्यायाधीश भारती काळे यांनी बोलून दाखवलं.
हे वाचलं का?
या घटनेत ६० वर्षीय महिला मुंबईत १० बाय १० च्या एका खोलीत आपला नवरा, दोन मुलं आणि नातीसोबत रहायची. ही महिला दिवसभर काम करुन मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि मुलाच्या कमाईतून हे घर चालायचं. पीडित मुलीच्या आईने घरगुती भांडणातून सात वर्षांपूर्वी घर सोडलं आहे. पीडित मुलही सातव्या इयत्तेत शिकत होती आणि आजी तिची सर्व काळजी घ्यायची. मे २०२१ मध्ये आजीला नातीची पाळी चुकल्याचं लक्षात आलं असता तिने चौकशी केली असता, मुलीचे वडील गेल्या वर्षभरापासून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करत असल्याचं समोर आलं.
यानंतर ६० वर्षीय महिलेने तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत योग्य त्या प्रक्रीयेनुसार कारवाई करत चार महिन्यांत खटला दाखल केला. यात पीडित मुलीच्या वडिलांनी आपली मुली इतर मुलांसोबत बोलत असताना मी तिला ओरडलो म्हणून यात मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येत आहे असं कोर्टासमोर सांगितलं. परंतू ६० वर्षीय महिलेने आपल्या मुलाविरुद्ध कोर्टात साक्ष देत सत्याची बाजू उचलून धरली.
ADVERTISEMENT
आपला मुलगा नातीला तिच्या मित्रांसोबत बोलू द्यायचा नाही आणि सतत घरातच रहा असं सांगायचा, ज्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. अनेकदा आपला मुलगा विविध कारणांवरुन नातीला मारहाणही करायचा, असं या महिलेने कोर्टासमोर सांगितलं. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला अहवाल आणि साक्ष यावरुन पीडित मुलीच्या गुप्तांगाच्या ठिकाणी झालेल्या जखमा या बलात्काराशिवाय होऊ शकत नाहीत असं निष्पन्न झालं. ज्यानंतर कोर्टाने आरोपी बापाला २५ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT