Kalyan: आजी-नातीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, पहाटे नेमकं काय घडलं?
GrandMother and GrandDaughter died in a sudden fire: कल्याण: कल्याण (Kalyan) पश्चिमेतील एक इमारतीला लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आज (17 जानेवारी) पहाटेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीत घरातील 70 वर्षीय आजी (Grandmother) आणि 22 वर्षीय नातीचा (granddaughter) होरपळून दुर्दैवी मृत्यू (Death) […]
ADVERTISEMENT
GrandMother and GrandDaughter died in a sudden fire: कल्याण: कल्याण (Kalyan) पश्चिमेतील एक इमारतीला लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आज (17 जानेवारी) पहाटेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीत घरातील 70 वर्षीय आजी (Grandmother) आणि 22 वर्षीय नातीचा (granddaughter) होरपळून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खातीजा हसम माइमकर (वय 79) आणि नातं इब्रा रौफ शेख (वय 22) असे मृतक महिलांची नावे आहेत. (70 year old grandmother and 22 year old granddaughter died in a terrible fire what really happened)
ADVERTISEMENT
कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी नावाने इमारती आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर माईमकर कुटुंब राहते. काल मध्यरात्रीच्या सुमारास घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पण मात्र थंडीचे दिवस असल्याने घरातील कुटुबीयांना जाग आली नाही. त्यानंतर अचानक पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत झाला आणि साडेतीन वाजेच्या सुमारास घराला आग लागली.
मुंबईतील प्रसिद्ध ‘अविघ्न’ पार्कवर पुन्हा ‘विघ्न’, लागली भीषण आग
हे वाचलं का?
या आगीने काही क्षणात भीषण रूप धारण करत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. घरातील संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच. पण घरात झोपलेल्या 70 वर्षीय आजी व त्यांची 22 वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या. आग विझवून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आजी आणि नात या दोघीच रहात होत्या. रात्री एक वाजेच्या सुमारास घरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला आणि अचानक घरातील हॉलमध्ये प्रथम आग लागली. त्यावेळी आजी आणि नात या दोघी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. धूर वाढल्यानंतर नातीच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्या दोघींनी खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉलमध्ये भीषण आग लागल्याने दोघीना बाहेर पडता आले नाही.
ADVERTISEMENT
दिल्लीतल्या इमारतीला भीषण आग; होरपळून २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
ADVERTISEMENT
त्याचवेळी आगीचा भडका उडला आणि धुराने दोघीही गुदमरल्या. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळविलं. पण तोवर बराच उशीर झाला होता.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेचचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT