कल्याण: डॉक्टरचं चीड आणणारं कृत्य; तब्बल 71 अल्पवयीन मुलांची सुटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण

ADVERTISEMENT

डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरातील एका दांम्पत्याने पाच दिवसाच्या पोटच्या बाळाला एक लाख रुपयात कल्याणमधील एका डॉक्टरला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ विकल्यानंतर दोनच दिवसानंतर बाळाच्या आईने आपले बाळ परत मागितलं. पण आरोपी डॉक्टरने बाळ देण्यास नकार दिला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला आणि डॉक्टरच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला.

ठाणे महिला व बालविकास विभाग आणि सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने बाळाला त्या दांम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र, कल्याणात डॉक्टर बेकायदेशीर बालक आश्रम चालवित असल्याचे उजेडात आले असून तेथून तब्बल 71 बालकांची सुटका करण्यात आली आहे. त्या बालकांना भिवंडी, उल्हासनगर शासकीय बालगृहात आणि डोंबिवलीत बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय आहे?

डोंबिवलीत राहणाऱ्या एका दाम्पत्याने कल्याण येथील डॉ. केतन सोनी यांना आपले 5 दिवसांचे बाळ 1 लाख रूपये किंमतीला विकले. हे दांम्पत्य एक वर्षापासून सोनी यांच्या संपर्कात होते. त्यांचा मोठा मुलगा आठ वर्षाचा असून तो डॉ. केतन सोनी यांच्या नंददीप संस्थेत एक वर्षापासून राहत होता.

ADVERTISEMENT

सदर महिला चार महिन्याची गर्भवती असताना तिने डॉ. सोनी यांना गर्भपात करण्याकरीता विचारणा केली होती. त्यावेळी डॉ. सोनी याने ‘गर्भपात का करता? त्यापेक्षा ज्या दांम्पत्यांना बाळ होत नाही अशा लोकांना तुम्ही ते बाळ देऊ शकता. याचा तुम्हाला मोबदला मिळेल.’ असं म्हणत डॉ. सोनीने त्यांचे वारंवार समुपदेशन केले होते.

ADVERTISEMENT

अखेर दांम्पत्याने बाळ होऊ देण्याचा विचार केला. 10 नोव्हेंबर 2021 रोजी त्या महिलेची शास्त्रीनगर येथे प्रसुती झाली, तिने मुलाला जन्म दिला. डॉक्टरने त्याचवेळी दांम्पत्याला संपर्क साधून बाळाची मागणी केली.

ठरल्याप्रमाणे 15 नोव्हेंबर 2021 रोजी डॉक्टराने त्या दांम्पत्याकडून 1 लाख रूपये देऊन त्यांचकडील पेपरवर सही घेऊन बाळाचा ताबा घेतला.

दोन दिवसानंतर आईने बाळ परत हवे त्यासाठी डॉक्टरांना फोन करून विनवणी केली. तुमचे पैसे मला नको, मला बाळ हवे आहे. मात्र, आता बाळाला विसर बाळावर तुझा काहीही अधिकार नाही. असे उत्तर डॉक्टरने दिले. त्यानंतर महिलेने घडलेला प्रकार डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्याना सांगितला.

दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बाल विकास बाळसंरक्षण विभागाने या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आई वडील व डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि बाळाची सुटका केली.

विना परवाना अनाथ व गरजू मुलांचे वसतीगृह चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

या तपासादरम्यान डॉक्टर केतन सोनी याने हे बाळ कल्याणमधील एका आश्रमामध्ये ठेवलं असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या टीमकडून त्या संस्थेची पाहणी करण्यात आली. त्यावेळेला त्या संस्थेत 29 मुले हजर असल्याचे दिसून आले.

पण याच वेळी लहान मोठया मुलींचे काही कपडे वाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मुली संस्थेत राहत नाहीत असे उत्तर दिले.

बालकल्याण समितीला संशय आल्याने त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या पथकासह संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या खोल्यांची तपासणी केली.

संस्थेच्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर संस्थेच्या बिल्डिंगपासून काही अंतररावर एका जुन्या इमारतीत मुले असल्याची कबुली देण्यात आली.

त्यानंतर ठाणे बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर 38 मुले-मुली हे वय वर्षे 2 ते 16 वयोगटातील एका खोलीत कोंडून ठेवल्याचे आढळून आले. त्या मुलांना ताब्यात घेऊन बालकल्याण समिती समोर आणण्यात आले.

आजूबाजूच्या ठिकाणांहून देखील 6 मुले संस्थेत आणण्यात आले. एकूण 71 बालकांची सुटका करण्यात आली.

धक्कादायक! नरबळीसाठी चेन्नईवरुन चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, दोन आरोपी अटकेत; बालकाची सुटका

विशेष म्हणजे संस्थेच्या तपासणीत उपस्थित 71 बालकांच्या कोणत्याही फाईल्स रजिस्टर बालकांशी संबधित कोणतेच कागदपत्र आढळून आले नसल्याने महिला व बालविकास विभागाकडून या मुलांची सुटका करत डॉ. केतन सोनी आणि इतरांविरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बाजारपेठ पोलिस करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT