भयंकर स्फोटाने तीन मजली इमारत जमीनदोस्त; ८ जणांचा जागीच मृत्यू
भयंकर बॉम्बस्फोटात एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या इमारतीमध्ये बॉम्ब बनवले जात होते, असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे. भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस ठाणे हद्दीत ही स्फोटाची घटना घडली. या […]
ADVERTISEMENT

भयंकर बॉम्बस्फोटात एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या इमारतीमध्ये बॉम्ब बनवले जात होते, असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे.
भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस ठाणे हद्दीत ही स्फोटाची घटना घडली. या दुर्घटनेत शेजारच्या २ ते ३ घरांचंही नुकसान झालं आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून पोलीस ठाणे केवळ १०० मीटर अंतरावर आहे. ही घटना बॉम्बस्फोटामुळे घडली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, तीन मजली इमारत पूर्णपणे भुईसपाट झाली.
दुर्घटनेत ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ८ गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरचे पोलीस उप महानिरीक्षक सुजित कुमार यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. प्राथमिक तपासात दारुगोळा, अवैध फटाके आणि गावठी बॉम्ब यामुळे स्फोट झाल्याचं आढळून आलं आहे. एफएसएलचे पथकाच्या तपासानंतरच स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.”