School Reopen : ८५ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार! शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर
राज्यातील ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत नाहीत अशा भागांत १५ जुलैपासून ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जास्त काळा राज्यातील शाळांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची […]
ADVERTISEMENT
राज्यातील ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत नाहीत अशा भागांत १५ जुलैपासून ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जास्त काळा राज्यातील शाळांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दाखवली आहे.
८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठीची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर इतर वर्ग कधी सुरु होणार याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सर्वेक्षण हाती घेतलं असून १२ जुलै रात्री ११ वाजून ५५ मिनीटांपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, पालक, शिक्षणाधिकारी यांनी आपलं मत या सर्वेक्षणात नोंदवण्याचं आवाहन शालेय शिक्षण विभागाने केलं आहे.
https://www.maa.ac.in/survey या लिंकवर जाऊन पालकांना आपली मत नोंदवायची आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात बहुतांश पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दाखवली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
-
आतापर्यंत २ लाख २५ हजार १९४ पालकांनी आपली मतं नोंदवली आहेत
यात ग्रामीण भागातून १ लाख १८ हजार १८२ पालकांनी मत नोंदवली आहेत
ADVERTISEMENT
निमशहरी भागातून २३ हजार ९८४ पालकांनी मत नोंदवली आहेत
ADVERTISEMENT
शहरी भागातून ८३ हजार ६४ पालकांनी मत नोंदवली आहेत
यापैकी १ लाख ८९ हजार ९५ पालक हे आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत.
तर ३६ हजार ९९ पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीयेत
ADVERTISEMENT