Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या 9 ट्रेन्स रद्द, वाचा यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पवासाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली. लोकल सेवाही ठप्पही झाली आहे. 9 एक्स्प्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनातर्फे गाड्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच ठाणे, माटुंगा या भागात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने नऊ गाड्या रद्द केल्या आहेत.

वाचा कोणकोणत्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत?

हे वाचलं का?

गाडी क्रमांक 02188 – मुंबई जबलपूर गरीब रथ विशेष यात्रा – प्रवासांची तारीख 18.07.202

गाडी क्रमांक 02811 – लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 19.07.2021

ADVERTISEMENT

गाडी क्रमांक 02169 – मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 18.07.2021

ADVERTISEMENT

गाडी क्रमांक 01141 – मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 18.07.2021

गाडी क्रमांक 02105 – मुंबई गोंदिया विशेष यात्रा -प्रवासाची तारीख 18.07.2021

गाडी क्रमांक 02109 – मुंबई मनमाड विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 19 .07.2021

गाडी क्रमांक 07057- मुंबई सिकंदराबाद विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 18.07.2021

गाडी क्रमांक 02111 -मुंबई अमरावती विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 18.07.2021

गाडी क्रमांक 07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष यात्रा – प्रवासाची तारीख 18.07.2021

पावसाचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली असून त्यामुळे कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT