Sangali: वनमोरेंचं अवघं कुटुंबच उद्ध्वस्त! ९ जणांनी विष प्राशन करुन संपवलं जीवन
सांगली: सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली आहे. विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे […]
ADVERTISEMENT
सांगली: सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली आहे. विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.
नरवाड रोड अंबिका नगर आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह घरात आढळून आले. हे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेले माणिक वनमोरे हे पेशाने डॉक्टर आहेत तर पोपट वनमोरे हे शिक्षक आहेत, अशा सुशिक्षीत कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा होता म्हणूनच सर्व कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT