क्रूर अत्याचाराने उस्मानाबाद हादरलं! 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, गुप्तांगावर ब्लेडनं केले वार
गणेश जाधव, उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील ही धक्कादायक घटना आहे. गावकऱ्यांनी […]
ADVERTISEMENT

गणेश जाधव, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील ही धक्कादायक घटना आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला अटक केली आहे.
शेतात नेहून बलात्कार केला, गुप्तांगावर ब्लेड केले वार
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंदफळ गावातील एक लहान मुलगी घराच्या पाठीमागे खेळण्यास गेली होती. माळुब्रा येथील 40 वर्षीय संतोष वडणे या नराधमाने तिला शेजारील शेतात नेहून बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात गेल्यावर आरोपी दुष्कृत्य करताना दिसला. आरोपी नग्न होता त्याला तसंच पकडून चोप दिला. या नराधमाने तिच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केल्याचं देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं. रक्तस्त्राव होत असल्याने तात्काळ पीडितेला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
आरोपीला फाशी द्या; मागणीला जोर
नराधम आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आता तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी आता उस्मानाबाद जिल्ह्यातून होत आहे.