Nana Patole यांची स्वपक्षातूनच मोठी कोंडी? काँग्रेसमधील खदखद वाढली
Nana Patole | Congress news : मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची स्वपक्षातूनच कोंडी करण्यात येत असल्याचं चित्र आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एबी फॉर्म प्रकरणावरुन हे चित्र अधिक गडद झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसमधील मोठा गट पटोले यांच्याविरोधात उभा राहिल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यात माजी आमदार आशिष देशमुख […]
ADVERTISEMENT

Nana Patole | Congress news :
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची स्वपक्षातूनच कोंडी करण्यात येत असल्याचं चित्र आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एबी फॉर्म प्रकरणावरुन हे चित्र अधिक गडद झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसमधील मोठा गट पटोले यांच्याविरोधात उभा राहिल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यात माजी आमदार आशिष देशमुख यांच्यापासून निलंबित सत्यजीत तांबे, काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, सुनील केदार यांची नावं घेता येतील. (A large group from congress stand against state president Nana Patole)
आशिष देशमुख यांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र :
नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर सोमवार (६ फेब्रुवारी) यादिवशीही देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष हटविण्याची मागणी केली.
आशिष देशमुख यांनी पत्रात म्हंटलं होत की,