नितीन गडकरी यांच्या घरासमोरच घेतलं विष, आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवलं. या व्यक्तीने बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल पत्र दिलं होतं. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं टोकाचं पाऊल उचललं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वर्धा रोड स्थित निवासस्थानाबाहेर बुलढाणा येथील एका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवलं. या व्यक्तीने बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल पत्र दिलं होतं. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं टोकाचं पाऊल उचललं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वर्धा रोड स्थित निवासस्थानाबाहेर बुलढाणा येथील एका व्यक्तीने शुक्रवारी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं, अशी माहिती समोर आली आहे.

विजय पवार पवार असं या व्यक्तीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे विजय पवार हे बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथील रहिवासी असून भाजपचे माजी पदाधिकारी आहेत.

बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले 55 वर्षीय विजय पवार यांनी नितीन गडकरी यांना शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गदरम्यान मेहकर ते लोणार मार्गावरील रस्त्यांची खराब स्थिती आणि खड्यांबाबत पत्र दिले होतं. परंतु त्यावर कारवाई झाली नसल्यामुळे पवार यांनी आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp