Pune Crime: पुण्यात बस स्टॉपवर झोपलेल्या मुंबईतील व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे (Pune) स्टेशनवरून मुंबईला (Mumbai) निघालेला प्रवासी काही काळासाठी बस स्टॉपवर झोपला असताना त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या (Murder) केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळखळ उडाली असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस (Pune Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव संजय बाबू कदम (वय 35) असं असून तो हा मूळचा मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कदम हा शिरुर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तो घाटकोपर येथे काल रात्री जाण्यास निघाले होता. पण काही वेळ आराम करण्याच्या दृष्टीने तो साधू वासवानी चौकातील एका बस स्टॉपवर झोपला. पण याच वेळी संजयच्या डोक्यात कोणीतरी दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. खरं तर पुण्यासारख्या शहरात असा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या घटनेची माहिती एका व्यक्तीने पोलिसांनी दिली. ‘या परिसरातून जात असताना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचं मला दिली आणि त्यानंतर मी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.’

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संजय हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यामुळे त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ADVERTISEMENT

मृत संजय याच्या जवळ जे कागदपत्र आढळून आले त्यावरुन तो घाटकोपर येथील असल्याचे स्पष्ट झाले. पण संजय याची हत्या नेमकी का करण्यात आली असावी याचा अद्यापपर्यंत उलगडा झालेला नाही. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असण्याची दाट शक्यता आहे. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही किंवा आरोपी देखील सापडलेला नाही. त्यामुळे आता बंडगार्डन पोलीस हे या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यामातून आरोपीचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

पुण्यासारख्या शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात अशा पद्धतीने झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आल्याने पुणेकरांच्या मनात अधिकच धडकी भरली आहे.

Pune Murder: कामावरून घरी जाताना PMPML चालकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

यामुळे या प्रकरणाचा तात्काळ छडा लावून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं मोठं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT