कुख्यात डॉन रवी पुजारी म्हणतो, मला पोलीस कस्टडीतच राहू द्या !
एखाद्या गुन्ह्यामध्ये जेव्हा पोलीस अधिकारी आरोपीला अटक करतात तेव्हा न्यायालयासमोर सादर करताना चौकशीसाठी त्या आरोपीची पोलीस कस्टडी मागितली जाते. पोलीस कस्टडीत चौकशीदरम्यान पोलिसांकडून होणाऱ्या टॉर्चरच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील, यासाठी अनेक आरोपींचे वकील न्यायालयात न्यायालयीन कोठडीची मागणी करतात. परंतू कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने बुधवारी कोर्टात स्वतःहून मला पोलीस कस्टडीतच राहू द्या अशी मागणी […]
ADVERTISEMENT
एखाद्या गुन्ह्यामध्ये जेव्हा पोलीस अधिकारी आरोपीला अटक करतात तेव्हा न्यायालयासमोर सादर करताना चौकशीसाठी त्या आरोपीची पोलीस कस्टडी मागितली जाते. पोलीस कस्टडीत चौकशीदरम्यान पोलिसांकडून होणाऱ्या टॉर्चरच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील, यासाठी अनेक आरोपींचे वकील न्यायालयात न्यायालयीन कोठडीची मागणी करतात. परंतू कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने बुधवारी कोर्टात स्वतःहून मला पोलीस कस्टडीतच राहू द्या अशी मागणी केली. मुंबई पोलिसांच्या इतिहासात रवी पुजारीसारख्या एका मोठ्या आरोपीने स्वतःहून पोलीस कस्टडीत राहू देण्याची मागणी करण्याचं हे पहिलंच प्रकरण मानलं जातंय.
२०१६ साली विलेपार्ले येथील गजाली रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा मिळाला आहे. बंगळुरु येथील कोर्टाने पुजारीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. बुधवारी रवी पुजारीला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ज्यात सरकारकडून Special Public Prosecutor सुनिल गोन्झालविस आणि खंडणीविरोधी पथकाकडून सचिन कदम या वकीलांनी बाजू मांडत पुजारीच्या पोलीस कस्टडीत वाढ करण्याची मागणी केली. ज्याला रवी पुजारीच्या वकीलांनी विरोध करत पोलिसांना या प्रकरणात चौकशी करण्याचा पुरेसा वेळ मिळाला असल्याचं सांगितलं.
रवी पुजारीचे वकील न्यायालयासमोर आपली बाजू मांडत असताना रवी पुजारी आपल्या जागेवरुन उठला आणि त्याने न्यायाधीशांसमोर आपलं म्हणणं मांडण्याची विनंती केली. न्यायाधिशांनी परवानगी दिल्यानंतर रवी पुजारीने आपल्याला पोलीस कस्टडीतच ठेवा…मला तपास अधिकाऱ्यांना काही माहिती द्यायची आहे असं सांगितलं. ज्यानंतर कोर्टाने रवी पुजारीच्या पोलीस कस्टडीत १५ मार्चपर्यंत वाढ केली आहे. २२ फेब्रुवारीला रवी पुजारीला खंडणीविरोधी पथकाने बंगळुरुवरुन मुंबईत आणलं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
रवी पुजारीविरोधात ५२ गुन्हे दाखल आहेत. २००२ साली इंटरपोलने रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली होती. यानंतर रवी पुजारीला सेनेगलवरुन भारतात आणण्यात आलं होतं. यानंतर अनेक वर्ष पुजारी बंगळुरु कोर्टाच्या कस्टडीत होता.
ADVERTISEMENT