गजा मारणेसारखीच दोन गुंडांची मिरवणूक, जेलमधून बाहेर येताच समर्थकांचा धुडगूस; Video व्हायरल
टिटवाळा: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gaja Marne) याची काही महिन्यापूर्वीच तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी अक्षरश: मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. असाच प्रकार आता कल्याण (Kalyan) तालुक्यातील वरप गावाजवळ असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण-टिटवाळा परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेले व मोक्कासारख्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर […]
ADVERTISEMENT

टिटवाळा: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gaja Marne) याची काही महिन्यापूर्वीच तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी अक्षरश: मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. असाच प्रकार आता कल्याण (Kalyan) तालुक्यातील वरप गावाजवळ असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.
कल्याण-टिटवाळा परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेले व मोक्कासारख्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटलेल्या गणेश मास्तर आणि महेश पाल यांची देखील अशाच प्रकारे मिरवणूक काढण्यात आली.
आरोपींच्या मित्रांकडून जल्लोष करून काढलेल्या मिरवणुकीचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. एखादा नेता निवडून आल्यासारखा जल्लोष यावेळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे कोरोनाचं संकट कायम असताना दुसरीकडे जेलमधून सुटणाऱ्या आरोपींचे हे शक्तीप्रदर्शन खरोखरच ओंगळवाण्या स्वरुपाचं आहे. यामुळे आता आरोपींसह त्यांच्या समर्थकांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.