ठाण्यातील घटना! मेट्रो ब्रिजखालून जाताना काळाने साधला डाव
ठाणे शहरात सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. जागोजागी बांधकाम सुरु आहे. मात्र एका चुकीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. आज (गुरुवारी) खड्ड्यात उतरुन कचरा वेचणाऱ्या महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजचे कामासाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे ही घटना घडली आहे. ही लोखंडी प्लेट इतकी […]
ADVERTISEMENT
ठाणे शहरात सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. जागोजागी बांधकाम सुरु आहे. मात्र एका चुकीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. आज (गुरुवारी) खड्ड्यात उतरुन कचरा वेचणाऱ्या महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजचे कामासाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे ही घटना घडली आहे. ही लोखंडी प्लेट इतकी वजनदार होती की, त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास करीत आहेत
ADVERTISEMENT
ठाण्यात मेट्रोचे काम जोरात सुरु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास कॅडबरी जंक्शन येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मेट्रो ब्रीजच्या बांधकामासाठी वापरात येणारी लोखंडी प्लेट अचानक खाली पडली. ती प्लेट खालून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत अज्ञात महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल
सदर घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष घाटेकर म्हणाले, मृत महिला ही त्याठिकाणी कचरा उचलायचं काम करत होती. अचानक तिच्या अंगावर सुरक्षा हेतू लावण्यात आलेली वजनदार लोखंडी प्लेट पडली. ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे.
हे वाचलं का?
मेट्रोच्या काम सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षेचे कारणामुळं बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. कारण आतमध्ये काम करत असताना कोणीही आत जाऊ नये. कारण या ठिकाणी वजनदार लोखंडी सेंट्रिंग प्लेटा लावण्यात आलेल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ही बॅरेकेटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही बॅरेकेटिंग करण्यात अलेल्या ठिकाणी जाऊ नये, असं आवाहन पोलीसांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT