दोन नवऱ्यांसोबत खुश… तरीही महिलेला करायचंय तिसरं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का!

मुंबई तक

ADVERTISEMENT

27-year-old social media star Larry Ingrid has had two marriages before
27-year-old social media star Larry Ingrid has had two marriages before
social share
google news

Women With two Husband : डिप्रेशन कधी कोणाला येईल आजकाल सांगता येत नाही. या डिप्रेशनमधून बाहेर यायला खुप वेळ लागतो.त्यात आता दोन नवऱ्यांमुळे डिप्रेशनवर मात केल्याची दावा 27 वर्षीय सोशल मीडिया स्टार लैरी इंग्रिडने दिला आहे. तिच्या या दाव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे लैरी इंग्रिडचे दोन लग्न (marriage)याआधी झाली आहेत. या दोन्ही लग्नांमुळे ती खुश होती. मात्र आता तिने तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लग्नामुळे आता ती चर्चेत आली आहे. (a women marriesd with to men now preparing for third marriage)

ADVERTISEMENT

कोण आहे ही महिला?

ब्राजीलची लैरी इंग्रिड म्हणजेच लेरीसा सोशल मीडिया स्टार (Social media Star) आहे. सोशल मीडियावर तिचे 3,60,000 फॉलोवर्स आहेत. लेरीसा एक सिंगर देखील आहे. तसेच ती टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर तिच्या लव्हस्टोरीचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. लेरीसाच्या पहिल्या पतीचे वय 25 वर्षे असून त्याचे नाव इटालो सिलवा आहे. तर तिचा दुसरा पती (Second Husband) हा अठरा वर्षाचा आहे, त्याचे नाव जोआओ विक्टर आहे. सिलवा पासून लेरीसाला एक मुलगी झाली आहे, तर विक्टर पासून तिला एक मुलगा आहे. इतकं कुटूंब असून देखील लेरीसा तिसऱ्या लग्नाची तयारी करतेय.

नवऱ्यानेच दिला लग्नाचा सल्ला

लेरीसा हिचा पहिला पती सिलवानेच तिला दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या रोमॅंटीक पार्टनर सोबत देखील फन केले पाहिजे, असे म्हणत त्याने हा सल्ला दिला होती. पतीच्या सल्ल्यानंतरच लेरीसाने तिच्या लहानपणीचा मित्र विक्टर सोबत लग्न केले. ती म्हणाली की ती विक्टरला लहाणपणापासून ओळखते. विक्टर तिच्या आईच्या घराशेजारी राहायचा. त्यामुळे विक्टरने देखील या नात्यात हसत हसत सामील झाला. सुरुवातीला तो थोड गडबडला होता,मात्र नंतर त्या तिघांनी एकच राहण्याचे अॅग्रीमेंटचं बनवले होते. आता ते तिघे एकत्र नात्यात असून सर्व आनंदात सुरु होते.

हे वाचलं का?

डिप्रेशनमध्ये जायला वेळ नाही

दोन पुरुषांसोबत राहत असल्याने मेंटल हेल्थला खुप मदत होत आहे, असे लेरीसा सांगते. माझ्याकडे आता डिप्रेशनमध्ये जायला वेळ नाही. दोन पुरुषांसोबत राहणे खुप चांगले असते. कारण ते तिच्यासाठी भांडी घासतात, घराची साफसफाई करतात,असे देखील लेरीसा म्हणते. सुरूवातीला या नात्यात राहणे खुप कठिण वाटत होते. मात्र वेळेनुसार मी या नात्याला स्विकारल्याची कबूली दुसरा पती विक्टरने दिली आहे.

या नात्यात महिलेला नाकारणार

सिलवा आणि विक्टरला लेरीसा सोबत तिसऱ्या व्यक्ती पाहावला जात नाही.त्यावेळेस त्यांना खुप वाईट वाटते. पण अशी एखादी घटना घडल्यास ते तिघेही एकत्र चर्चा करतात. विशेष म्हणजे या नात्यात लेरीसा स्वत:साठी तिसऱ्या नात्याचा पर्याय खुला ठेवतेय, मात्र कोणत्याही महिलेला या नात्यात सामील करून घेणार नसल्याचेही म्हणते आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT