बुरखा घालून मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरूणाला बेदम मारहाण, साताऱ्यातली धक्कादायक घटना
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक युवक बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात तरूण असल्याचं लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय? अशा संशयाने त्याला मारहाण करण्यात आली. तोच शाहूपुरी पोलिसांना फोन करून […]
ADVERTISEMENT

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक युवक बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात तरूण असल्याचं लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय? अशा संशयाने त्याला मारहाण करण्यात आली. तोच शाहूपुरी पोलिसांना फोन करून युवकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच तो मैत्रिणीला भेटायला आल्याचे सांगितलं.
बुरखा घालून मैत्रिणीला भेटायला आला तरूण
साताऱ्यातल्या तामजाईनगरमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक युवक बुरखा घालून आपल्या मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरचा पत्ता माहिती नसल्याने तो शाळा कुठे आहे. अशी हिंदी भाषेतून विचारणा करू लागला. बुरख्यातून पुरूषाचा आवाज येत असल्याने दुकानदाराला संशय आला. त्याने युवकाला उलटसुलट प्रश्न विचारले, युवकाला पकडून ठेवले. यामुळे हा युवक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने आरडाओरडा करत इतर लोकांना बोलवलं.
बुरखा घालून डान्स केल्याने अभिनेत्री मंदाना झाली ट्रोल
बुरख्यात असलेल्या तरूणाला लोकांनी केली मारहाण
तरूण बुरख्यात आला आहे हे लक्षात येताच लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बघता बघता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. यातील एकाने शाहूपुरी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि युवकाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाक्या दाखवताच तो घडाघडा बोलू लागला. तो मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरी हे मान्य नसल्याने तो बुरखा घालून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड भरून घेतला.
सातारा : शिरवळमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; हॉस्टेलमध्ये घडली घटना
मुलं पळविणाऱ्या टोळीची अफवाच
सातारा शहरात मुले पळविणारी टोळी आली आहे. ही अफवा प्रत्येकांच्या मनात आहे. यामुळे घटना घडली की, त्याला टोळी आली हेच नाव दिले जात आहे. परंतु घटनेमागचे वास्तव वेगळे असते. ही बाब आता सगळयांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मुले पळविणाऱया अफवांना बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही केले आहे.