पुण्यात लिव्ह इनमधे राहणाऱ्या तरूणीचा शरीरसंबंधांना नकार, तरूणाने नॉनस्टिक तव्याने केली मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरूणीने शरीर संबंध ठेवण्यात नकार दिल्याने तरूणाने तिला बेदम चोपल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. लिव्ह इनमधे राहणारे तरूण आणि तरूणी दोघेही पेशाने शिक्षण घेत आहेत. या तरूणाने आपल्याला नॉन स्टिक तव्याने मारहाण केल्याचं तरूणीने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

योगेश्वर पगारे असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे. योगेश्वेर हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असून पीडित तरूणी बिझनेस मॅनेजमेंट करते आहे अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इंजिनीअरने चाकू भोसकून केला खून

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश्वर आणि ही तरूणी गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकाच राहात आहेत. चार दिवसांपूर्वी योगेश्वरने या तरूणीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी विचारणा केली. तेव्हा तरूणीने हे संबंध ठेवायला नकार दिला. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला ज्यानंतर योगेश्वरने नॉन स्टिक तव्याने तरूणीला हातावर आणि पोटावर फटके मारले.

ADVERTISEMENT

योगेश्वरने तरूणीला प्लास्टिक पेनने जखमी केलं असंही तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल तरूणीने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितलं. यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांनी आणि भावाने योगेश्वरच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रखरणी योगेश्वरला अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT