आम्ही देशभरात काँग्रेसची जागा घेणार, पंजाबमधील यशानंतर ‘आप’चा आत्मविश्वास दुणावला
दिल्ली विधानसभेची सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने आता राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. हे कल असेच कायम राहिले तर आम आदमी पक्षासाठी ही दिल्लीबाहेरची पहिली सत्ता ठरणार आहे. हे कल पाहिल्यानंतर आम आदमी पक्षाचा विश्वास दुणावला असून भविष्यात […]
ADVERTISEMENT
दिल्ली विधानसभेची सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने आता राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. हे कल असेच कायम राहिले तर आम आदमी पक्षासाठी ही दिल्लीबाहेरची पहिली सत्ता ठरणार आहे. हे कल पाहिल्यानंतर आम आदमी पक्षाचा विश्वास दुणावला असून भविष्यात आम आदमी पक्ष देशभरात काँग्रेसची जागा घेईल असा विश्वास आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
“आम्ही ‘आम आदमी’ आहोत. पण हा ‘आम आदमी’ जेव्हा जागा होतो तेव्हा सत्तेची मोठमोठी सिंहासन हलतात. भारताच्या इतिहासात हा सर्वात मोठा दिवस आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीबाहेर आणखी राज्य जिंकलं म्हणून हे निकाल महत्वाचे नाहीत पण या निमीत्ताने आम्ही राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचा भाग बनणार हे महत्वाचं आहे. येणाऱ्या काळात आम आदमी पक्ष देशभरात काँग्रेसची जागा घेईल असा विश्वास राघव चढ्ढा यांनी व्यक्त केला आहे.
We're 'aam aadmi' but when 'Aam Aadmi' rises mightiest of thrones shake. Today's an imp day in India's history,not only because AAP is winning one more state but because it has become a national force. AAP will become Congress' replacement: AAP’s Punjab co-in charge Raghav Chadha pic.twitter.com/X4NJ0zxeC3
— ANI (@ANI) March 10, 2022
पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्येच आम आदमी पक्षाने आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल केली आहे. सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसची पंजाबमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हे कल असेच कायम राहिले तर पंजाबचं राज्य आम आदमी पक्षाकडे जाणार असं दिसतंय. खासदार भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असून मुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागणार अशी चिन्ह दिसत आहेत.
हे वाचलं का?
Election Results 2022 Live Updates : पंजाबमध्ये ‘आप’ भांगडा! स्पष्ट बहुमताच्या दिशेनं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT