Mumbai vaccination scam: मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणी बारामतीमधील लॉजमधून आरोपीला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, बारामती

मुंबईतल्या (Mumbai) उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बोगस लसीकरणाचे (fake vaccination scam) बारामती (Baramati) कनेक्शन उघड झाले आहे. बोगस लसीकरण प्रकरणात बारामतीतून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कांदिवली (Kandivali) पोलिसांनी यापूर्वीच आठ आरोपींना अटक केली आहे.

राजेश पांडे असं या डॉक्टर आरोपीचे (Accused doctor) नाव आहे. गुरुवारी रात्री बारामती पोलिसांच्या पथकाने लॉजमध्ये लपलेल्या या डॉक्टरला ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजेश याने मुंबईतल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून लोकांचे लसीकरण केलं होतं. आणि लसीकरण झाल्याचे वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.

याप्रकरणी मुंबईतल्या कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी विविध भागातून आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांचा साथीदार बारामतीतल्या एका लॉजवर लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने बारामती पोलीस ठाण्याला याबाबत कळवलं.

ADVERTISEMENT

त्यानुसार आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. 30 मे 2021 रोजी झालेले लसीकरण बोगस असल्याची माहिती उघड झाली होती. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

Exclusive: मुंबई Vaccination घोटाळ्याचं गूढ उलगडलं!

पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेले 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक कारही जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यातच प्रकरणातील आरोपी डॉक्टर बारामतीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बोगस लसीकरणाचे धागेदोरे बारामतीपर्यंत कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT