अभिनेता अजय देवगण लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार डेब्यू

मुंबई तक

सध्या अनेक बॉलिवूड कलाकार वेब सिरीजमध्ये झळकताना दिसत आहे. सैफ अली खान, माधुरी दिक्षीत, अभिषेक बच्चन हे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. तर यामध्ये आता अजून एका अभिनेत्याची भर पडली आहे. अभिनेता अजय देवगण लवकरच एका वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ असं या सिरीजचं नाव असणार आहे. ही एक क्राईम ड्रामा सीरीज असणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या अनेक बॉलिवूड कलाकार वेब सिरीजमध्ये झळकताना दिसत आहे. सैफ अली खान, माधुरी दिक्षीत, अभिषेक बच्चन हे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. तर यामध्ये आता अजून एका अभिनेत्याची भर पडली आहे. अभिनेता अजय देवगण लवकरच एका वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ असं या सिरीजचं नाव असणार आहे.

ही एक क्राईम ड्रामा सीरीज असणार आहे. अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या सुरु आहे. या सिरीजचं शूटींग मुंबईमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. या सिरीजच्या माध्यमातून अजय देवगण पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा दिसणार अजय देवगण Vs अजय देवगण

‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ही एक वेगळी कॉप स्टोरी असणार आहे. या सिरीजची स्टोरी तसंच स्टोरीचं स्वरूपंही वेगळणं असणार आहे. या थ्रिलर आणि क्राईम ड्रामात अजयला पाहण्यासाठी त्याचे फॅन्स फार उत्सुक आहेत. ही नवी वेब सीरीज ब्रिटीश मालिका ‘लूथर’वर आधारित आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी 2021 हे फार बिझी वर्ष असणार आहे. अजयचे अनेक सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. या सिनेमांच्या लिस्टमध्ये मैदान आणि आरआरआर या बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp