अभिनेता अतुल कुलकर्णीचं एकच वाक्य.. नेटकरी म्हणाले ‘सॉलिड’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी कंगना रणौतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्य ही आपल्याला मिळालेली भीकच आहे हे कंगनाचं म्हणणं बरोबर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आज शरद पवार यांनीही विकृत लोकांबाबत काही भाष्य करणार नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे अभिनेता अतुल कुलकर्णीने ट्विट केलेलं एक वाक्य नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

आज मराठी माणूस भरडला जातो आहे. सध्याचं महाविकास आघाडी सरकार हे चुकलेलं गणित आहे, हे गणित सुधारण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर आहे, अशात भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. कंगनाने देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वक्तव्य केलं ते योग्यच आहे. देशासाठी लढणारे लोक फासावर जात होते त्यावेळी आपले लोक बघत बसले होते असं विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

अतुल कुलकर्णी यांनी एका ओळीचं ट्विट केलं आहे

Seniority and Wisdom are two different things.

ADVERTISEMENT

#globalphenomenon

ADVERTISEMENT

असं म्हणत अतुल कुलकर्णींनी हे ट्विट केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ चूक कबूल केली? विक्रम गोखले काय म्हणाले?

ज्येष्ठता आणि शहापणा या दोन भिन्न गोष्टी आहेत या आशयाचं ट्विट अतुलने केलं आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी सॉलिड असा रिप्लाय करत त्याच्या ट्विटचं कौतुक केलं आहे. #globalphenomenon असा हॅशटॅग देऊन जरी हे ट्विट केलं असलं तरीही लोकांनी याचा संदर्भ थेट विक्रम गोखलेंच्या वक्तव्याशी जोडला आहे. सॉलिड, मस्तच, सहीच.. अशा प्रतिक्रिया देत अनेक नेटकऱ्यानी अतुल कुलकर्णीचं कौतुक केलं आहे.

ज्या बाळासाहेबांची भाषणं ऐकून महाराष्ट्र केली ४० वर्ष तृप्त झाला आहे त्याच बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणामधले खेळ सुरु आहेत ते विचीत्र स्तरावर पोहचले आहे. मराठी माणूस यात भरडला जातोय, लोकं अस्वस्थ आहेत. प्रसारमाध्यमांना याची फारशी कल्पना नसेल. आमच्यासारखी माणसं बाहेर फिरतात तेव्हा सर्व क्षेत्रातील लोकांशी आमचा संबंध येतो तेव्हा प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की हे गणित चुकलेलं आहे असंही विक्रम गोखले म्हणाले होते. मात्र या सगळ्या वक्तव्यांवर अतुल कुलकर्णीने ट्विट केलेली एक ओळच पुरेशी आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT