नवाजुद्दीनचा ‘हड्डी’तील लुक बघून लोक म्हणाले, ही तर अर्चना पूरणसिंह; अभिनेत्री म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा होते आहे, ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नव्या सिनेमाच्या प्रोमोची. हड्डी या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. या सिनेमाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखणंही कठीण आहे. कारण नवाज या टीझरमध्ये चक्क स्त्री वेशात दिसतो आहे. एवढंच नाही, तर नवाजचा हा लुक पाहून त्याची तुलना थेट अर्चना पूरणसिंहसोबत केली जात आहे. आता यावर अभिनेत्री अर्चनानेही प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

हड्डीच्या टीझरमध्ये स्त्री रूपात दिसतो आहे नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजउद्दीन सिद्दीकी हा एक गुणी अभिनेता आहे. त्याच्या खास अभिनयातून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. नवाजुद्दीन आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये त्याने साकारलेला गणेश गायतोंडे जगभरात पोहचला. आता त्याच्या हड्डी या सिनेमाचा टीझर रिलिज झाला. त्या टीझरमध्ये लेडी बॉस अवतारात नवाज दिसतो आहे. त्याच्या या लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. अर्चना पूरणसिंह सोबत नवाजची तुलना आता केली जाते आहे.

नवाजचा नवा लुक पाहून हैराण झाले लोक

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला. स्त्रीवेशातल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखणं मुश्किल झालं आहे. पोस्टरमध्ये नवाजुद्दीन खास लुकमध्ये दिसतो आहे. ग्रे कलरचा शिमरी गाऊन नवाज लेडी लुकमध्ये दिसतो आहे. स्टायलिश हेअर स्टाईल, वेगळाच लुक यामध्ये नवाज एकदम खास दिसतो आहे. नवाज या सिनेमाच्या टीझरमध्ये एकदम भारी दिसतो आहे. नवाजुद्दीनला स्त्री वेशात पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं आहे. लोक नवाजुद्दीनच्या या लुकची तुलना अर्चना पूरणसिंहसोबत करत आहेत.

हे वाचलं का?

अर्चना पूरणसिंहने या तुलनेबाबत काय म्हटलं आहे?

अर्चना पूरणसिंह आणि नवाजच्या स्त्रीवेशाची तुलना झाल्यानंतर आता अर्चनानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अर्चना पूरणसिंह म्हणाली की नवाजची या लुकमधली हेअरस्टाईल माझ्यासारखीच आहे. त्यामुळेच लोक तुलना करू लागले आहेत. कपिल शर्मा शो मध्ये मी असाच लुक ठेवत होते असंही अर्चनाने म्हटलं आहे. तसंच नवाजसोबत माझी तुलना होते आहे त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही अर्चनाने म्हटलं आहे.

कधी येणार हड्डी हा सिनेमा?

सिनेमाच्या मेकर्सनी या सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे. तसंच हड्डी या सिनेमाच्या रिलिजची डेटही सांगितली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२३ मध्ये येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा हड्डी सिनेमा अक्षत शर्माने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात नवाजचा रोल नेमका असणार ? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT