The Kapil Sharma Show: स्मृती इराणी पोहचल्या कपिल शर्माच्या सेटवर .आणि झालं भलतंच
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘द कपिल शर्मा’ शोच्या निर्मात्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांचा हा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. जेव्हा स्मृती इराणी या स्टुडीओच्या गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरला त्यांना ओळखता आले नाही, […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘द कपिल शर्मा’ शोच्या निर्मात्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांचा हा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. जेव्हा स्मृती इराणी या स्टुडीओच्या गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरला त्यांना ओळखता आले नाही, असे सांगितले जात आहे.
स्मृती इराणी सेटवर पोहोचल्या असता, तेथील गार्डने त्यांच्या ड्रायव्हरला थांबवून गाडी आत सोडण्यास नकार दिला. या दरम्यान ड्रायव्हर आणि गेटकीपरमध्ये बरीच वादावादी देखील झाली. परंतु, यातून काही निष्पन्न झाले नाही. यानंतर वैतागलेल्या स्मृती इराणी शूटिंग न करताच दिल्लीला परतल्या.