Pathan Movie: बिकीनीचा वाद अन् पुष्कर श्रोत्रीने राम कदमांना सरळ दिलं ‘हे’ चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathan Movie Bikini Controversy: मुंबई: मागील काही वर्षात एखाद्या विचारधारेशी सुसंगत नसणारे किंवा टिकात्मक सिनेमे (Movie) प्रदर्शित झाले तर त्यांना बॉयकॉट करा अशी सर्रास भूमिका ही जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून घेतली जात आहे. अशातच आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah rukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathan) सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) अवघ्या 10 सेकंदासाठी घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन (Saffron Colour Bikini) प्रचंड वाद निर्माण झाला आहे. हा सिनेमा आपण चालू देणार नाही अशी भूमिकाच यावेळी भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी घेतली आहे. मात्र, राम कदमांच्या याच भूमिकेला थेट विरोध करत मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने (Pushkar Shrotri) त्यांना एक चॅलेंजच दिलं आहे. (actor pushkar shrotri gave a direct challenge to bjp mla ram kadam over deepika padukones saffron bikini controversy in pathan movie)

‘मुंबई तक’च्या (Mumbai Tak) विशेष कार्यक्रमात बोलताना पुष्करने राम कदम याने आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं की, ‘कोणत्याही रंगावर आपल्याला अधिकार सांगता येत नाही. तसंच सिनेमा जर सेन्सॉरने परवानगी दिलेला असेल तर त्याला बॉयकॉट करा असं सांगणारे आपण कोण आहोत?’ असं म्हणत पुष्करने दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेऊन सिनेमाच बॉयकॉट करा असं आवाहनच चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

पुष्कर श्रोत्रीने भाजप आमदार राम कदमांना काय दिलं आव्हान?

‘राम कदमजी, तुम्ही जर गाणं पाहिलं तर अनेकविध रंग आहेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही हे जाहीरपणे सांगा की, हा चित्रपट बघा, आवडला तर त्याचं कौतुक करा. आवडला नाही तर ते दुपटीने शंभर लोकांना सांगा की, हा चित्रपट वाईट आहे तुम्ही तो बघायला जाऊ नका. पण आधी चित्रपटगृहात जा असं तुम्ही इथे जाहीरपणे का नाही बोलत?’ असं म्हणत पुष्कर श्रोत्रीने राम कदम यांना जाहीर कार्यक्रमातच सुनावलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मुंबई तक’च्या विशेष कार्यक्रमात कलाकारांसाठी पुष्कर श्रोत्री थेट भिडला!, पाहा नेमकं काय म्हणाला:

‘पठाण’चा वाद वाढला; हिंदूसह आता मुस्लिम संघटनाही शाहरुख खानच्या विरोधात वातावरण तापवणार

ADVERTISEMENT

मला असं वाटतं ना हा सगळा गंमतीशीर खेळ सुरु झाला आहे. एक पॅरेलल प्रकारची सेन्सॉरशीप सुरु झाली होती. साधू-संत यांनी सगळ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यामागचं खरं कारणही मला कळत नाहीए. त्याने आक्षेप नोंदवण्याच्या मागे त्यांना हे कोणी आणि कसं-काय दाखवलंय आणि काय सांगितलंय हेही मला खरोखर कळत नाहीए. कारण खऱ्या अर्थाने काम-क्रोध-मद-मोह-मत्सर या सगळ्या षडरिपूंचा त्याग करुन जी आपल्या आशीर्वचनं देण्यासाठी कटीबद्ध असणारी ही साधू-संतांची फळी आहे. ज्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आपण घ्यावं. अशा लोकांना सिनेमातील हे गाणं दाखवून तुम्हाला यावर काय वाटतं हे विचारणं देखील चुकीचं आहे या मताचा मी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सेन्सॉरने हा सिनेमा आणि यातील गाणं जर संमत केलं असेल तर आज कोणीतरी उभं राहिलं आणि निर्माता दिग्दर्शकाची एक बाजू मांडावी मग निर्माते-दिग्दर्शक तिकडे गेले. असं चालू शकत नाही. ही बाजू मांडण्यासाठीच सेन्सॉर बोर्ड असतं. त्यांच्यासमोर निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांची बाजू कलात्मकरित्या मांडलेली असते. त्याला आक्षेप घ्यायचा असेल तर ते सेन्सॉर बोर्ड हे सर्वसंमत असं बोर्ड असतं त्यांनी आक्षेप नोंदवायचा असतो. आपल्याला ते गाणं आवडतंय की नाही, चित्रपट आवडतोय की नाही. माझ्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत मला तो चित्रपट पाहायचा नाहीए. इतपर्यंत प्रत्येकाचं व्यक्तीसापेक्ष मत प्रत्येकाचं असू शकतं. यामुळे प्रत्येकाने ठरवायंच की सिनेमा पाहायचा की नाही. त्यात आक्षेप नोंदवण्यासारखं काही नाही. पण हा माझा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की, या देशात केंद्रातील सरकार असेल किंवा राज्यातील सरकार असेल यांच्यावर माझा पूर्ण विश्वास अशासाठी आहे की, कारण केवळ हिंदूच नाही तर कुठल्याही धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देणारी दोन्ही सरकारं आहेत. यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या जातील, मग आमच्या देवदेवतांची चेष्टा असो, त्यांचे वेगवेगळे चित्र काढणं असो. असं कोणी केलं तर आम्ही खपवून घेणार नाही. पण त्यासाठीचा विरोध नोंदविण्यासाठी आपल्याकडे एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण म्हणून बॉयकॉट हा मुद्दा फारच चुकीचा आहे. कोव्हिडनंतर अद्यापही म्हणावे तसे प्रेक्षक येत नाहीएत. माझ्यासारखे कलाकार धास्तावले आहेत. मी एक छोटा निर्माता आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं याचा विचार करत असताना पुन्हा जर कुठल्याशा एका क्षुल्लक गोष्टीवरुन.. क्षुल्लक मी अशासाठी म्हणतोय की, त्यांच्या भावना क्षुल्लक नाहीत. तर कपड्यांचा रंग हा असावा की तो असावा.. हा प्रश्नच किती किरकोळ आहे. त्या गाण्यामध्ये दीपिकाने वेगवेगळ्या अनेक रंगांचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा असे अनेक कपडे आहेत तिचे. आता मग रंगावर प्रत्येक पक्ष किंव धर्माचा हक्क असू शकत नाही. हा रंग सगळ्याचा असतो. पांढरा रंग माझा आहे आणि हिरवा रंगही माझा आहे. भगवा रंग माझा आहे आणि निळा रंगही माझाच आहे. कारण या रंगांनी वेळोवेळी मला आनंद दिलाय. हे सगळे रंग माझेच आहेत. आता या गाण्यात तिने वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले असताना फक्त 10 सेंकदासाठी दिसतोय.. ज्याला तुम्ही भगवा म्हणताय त्याला तुम्ही केशरी म्हणू शकता. त्याला तुम्ही ऑरेंज म्हणू शकता. केवळ शब्दछल केला म्हणून कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्या. तर हे चुकीचं आहे. लोकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे. राम कदम साहेब.. तुम्ही किंवा काय अनेक पक्षातील लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहेच. पण यापुढेही केली पाहिजे. बॉयकॉट ही सिस्टम अत्यंत चुकीची आहे. कारण तिकडे आमचे पैसे पणाला लागलेले असतात. निर्माते आपली घरं गहाण टाकून चित्रपट बनवत असतात. या सगळ्याला तुम्ही एका रंगामुळे बॉयकॉट टाकून चित्रपट पाहू नका हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. या देशामध्ये असं काही होईल हे अजिबात अपेक्षित नव्हतं. यामुळे चित्रपटसृष्टीला खूप नुकसान होईल. राम कदमजी, तुम्ही जर गाणं पाहिलं तर अनेकविध रंग आहेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही हे जाहीरपणे सांगा की, हा चित्रपट बघा, आवडला तर त्याचं कौतुक करा. आवडला नाही तर ते दुपटीने शंभर लोकांना सांगा की, हा चित्रपट वाईट आहे तुम्ही तो बघायला जाऊ नका. पण आधी चित्रपटगृहात जा असं तुम्ही इथे जाहीरपणे का नाही बोलत? मला असं वाटतं कोणताही प्रश्न चर्चेने सोडवू शकतो. आपण पूर्णपणे लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. मुळात चर्चेतून हा प्रश्न सुटला पाहिजे. याचा परिणाम चित्रपटावर होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं सवंग प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर काही बोलणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी बॉयकॉट करतोय असं म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही. कोर्टावर आपण विश्वास ठेवावा. पण चित्रपटावर बॉयकॉट करा असं सांगणं मला अजिबात पटत नाही. मला यामध्ये विकृती दिसत नाहीए. कारण हा रंग माझ्या शेजारून गेला. स्विगीवाला गेला. त्याच्या अंगावर देखील भगवाच रंग आहे. तो तिकडे नियम तोडून गेला. मग असं म्हणायचं का की, स्विगीवर बॅन आणायचा. यात खरंच विकृती, आक्षेपार्ह असं काही दिसत नाही. त्या गाण्यात एवढ्या रंगाचे कपडे आहेत. त्यात एक रंग आहे. तो अगदी पाच-दहा सेकंद दिसतोय. यावर चर्चा होऊ शकते. पण मला तरी विकृती वाटलेली नाही. असं म्हणत पुष्कर श्रोत्रीने सिनेमा बॉयकॉट विरोधात थेट भूमिका घेतली. ज्याबाबत सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याचं कौतुकही केलं आहे.

पुष्कर श्रोत्री, अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक

ADVERTISEMENT

राम कदम म्हणतात, सिनेमा चालू देणार नाही…

दरम्यान, सिनेमाच्या वादावरुन राम कदम यांनी म्हटलं होतं की, ”पठाण फिल्मला देशभरातील साधू-संत, महात्मासहित social media वर देखील अनेक हिंदू संघटना आणि करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे. अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनतेसमोर यावे. मात्र महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सीरियल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम..’ असं वक्तव्य राम कदम यांनी केलं आहे.

Pathaan Release Date : ‘पठाण’ येतोय! शाहरुख खानने प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

आता या सिनेमामुळे झालेला वाद मिटविण्यासाठी निर्माते सिनेमा प्रदर्शनाआधी त्यात काही बदल करणार की, आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT