केतकी चितळेला अटक! गुन्हे शाखेच्या कोठडीत गेली रात्र, आता पुढे काय होणार?

मुंबई तक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला (Ketaki chitale) शनिवारी (14 मे) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिला गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. दरम्यान, तिला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला (Ketaki chitale) शनिवारी (14 मे) सायंकाळी पोलिसांनी अटक केली.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिला गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. दरम्यान, तिला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यातच आता पुणे पोलिसांकडून तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शनिवारी (१४ मे) अटक केली. केतकी चितळेला कळंबोलीतून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आल्यानंतर तिला कोठडीत ठेवण्यात आलं.

केतकी चितळेला ताब्यात घेत असताना बराच गोंधळ शनिवारी बघायला मिळाला. पोलिसांकडून केतकीला ताब्यात घेण्याची कारवाई होत असताना संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी केतकी चितळेवर अंडी आणि शाहीफेकही करण्यात आल्याचाही प्रकार घडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp