आधुनिक महिलांना आळशी म्हणणारी सोनाली कुलकर्णी झाली ट्रोल, आता म्हणाली..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sonali Kulkarni on Women Statement: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका कार्यक्रमात सोनालीने आधुनिक भारतीय महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर तिला ट्विटरवर (Twitter) रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता सोनालीने तिने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा उद्देश नव्हता असं म्हणत तिने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (actress sonali kulkarni became a troll for calling modern women lazy had to apologize)

ADVERTISEMENT

सोनालीने मागितली माफी

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पत्रक जारी करून तिचे म्हणणे शेअर केले आहे. यामध्ये तिने लिहिले की, ‘मी देखील एक महिला आहे, माझा उद्देश इतर महिलांना दुखावण्याचा नव्हता. स्त्रीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याबद्दल मी अनेकदा उघडपणे बोलले आहे. तसेच, मी आपल्या सर्वांच्या बाजूने बोलले आहे. तुम्ही लोकांनी माझ्या मुद्द्यावर टीका केली याचा मला आनंद आहे. मी केवळ महिलांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्याशी नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करत आहे.’

तिने पुढे लिहिले की, ‘याबाबत तेव्हाच मदत मिळेल, जेव्हा आम्ही स्त्रिया आपल्या नाजूकपणाने आणि बुद्धिमत्तेने स्वतःच्या पायावर उभे राहू शकू . जर आपण सहानुभूतीशील आणि सर्वसमावेशक लोक बनलो तर आपण एक निरोगी आणि आनंदी जागा तयार करू शकू. यासोबत मी सांगू इच्छितो की, जर माझ्या बोलण्याने तुमचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागते. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’

हे वाचलं का?

सोनाली कुलकर्णीने नेमकं काय वक्तव्य केलेलं?

सोनालीने एका मुलाखतीदरम्यान आधुनिक महिलांना आळशी म्हटले होते. ती म्हणाली होती की, ‘भारतातील अनेक मुली आळशी आहेत. त्यांना चांगला कमावणारा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा असतो. ज्याचे स्वतःचे घर आहे. ज्याला नियमित वेतनवाढ मिळते. पण या सगळ्यात स्त्रिया आपले पाय रोवण्यास विसरतात. काय करावे हे महिलांना कळत नाही. मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही तुमच्या घरी अशाच महिलांना आणा ज्या स्वत: सक्षम असतील आणि स्वतःसाठी कमवू शकतील. जी म्हणू शकते की हो, मला या घरात फ्रीज हवा आहे, तुम्ही त्यासाठी अर्धे पैसे द्या, मी अर्धे देते.’

ADVERTISEMENT

‘सोशल वर्कर’च्या प्रेमात पडली महिला IPS, अशी आहे Love Story…

ADVERTISEMENT

उर्फी भडकली…

सोनाली कुलकर्णीच्या या वक्तव्यावर तिला सोसल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं. सोनालीच्या या बोलण्यावर अनेक महिला यूजर्स भडकल्या. अभिनेत्रीच्या विचारसरणीत दोष असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं. गायिका सोना मोहपात्रा हिने सोनाली कुलकर्णीचे बोलणे हास्यास्पद असल्याचे म्हटले होते.

सोनाली कुलकर्णी स्कॉटलँडमध्ये करते आहे सुट्टी एंजॉय! पाहा खास फोटो

त्याचवेळी बिनधास्त अभिनेत्री उर्फी जावेदनेही सोनालीच्या शब्दांना असंवेदनशील म्हटले आहे. तिने लिहिलं की, ‘आधुनिक महिला कामासह घर सांभाळत असताना तुम्ही आळशी म्हणत आहात. चांगला कमावणारा नवरा हवा असेल तर काय हरकत आहे? शतकानुशतके, पुरुषांनी स्त्रियांना मूल जन्माला घालण्याचे यंत्र आणि हुंड्याचे साधन मानले आहे. स्त्रियांनो, तुम्ही काही मागायला अजिबात घाबरू नका.’

दीड वर्षांचा मुलगा असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत संबंध, तरूणीने वरात येण्याआधी उचललं भयंकर पाऊल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT