आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारची लाज काढताच मुनगंटीवारांचा पारा चढला…
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाला. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत दिले. त्यानंतर विरोधकांनी मंत्री गावित यांना घेरले. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याचे सांगत आमदार जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाला. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत दिले. त्यानंतर विरोधकांनी मंत्री गावित यांना घेरले. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याचे सांगत आमदार जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनात काल (बुधवारी) सभागृहाच्या बाहेर जोरदार राडा पाहायला मिळाला होता. सत्ताधारी-विरोधक आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने मोठा निर्माण झाला होता. त्यानंतर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कुपोषणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले.
गावित यांच्या उत्तरावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी समाजासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये राजकारणी म्हणून काही करु शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्यही त्यांनी केले.
हे वाचलं का?
ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) चांगलेच आक्रमक झाले. लाज वाटली हा शब्द असंसदीय आहे. तो वापरला नाही पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवर म्हणाले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता. मग आपल्या वडिलांना लाज वाटली का असे म्हणत आहात का? असा प्रतिसवाल मुनगंटीवार केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला.
त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असे म्हणालो असल्याचे सांगत आमदार जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाजूने बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेरकर यांनी लाज वाटली पाहिजे हा असंसदीय शब्द असल्याचे सांगत मी तपासून यावर निर्णय घेईल असे म्हटले.
ADVERTISEMENT
विरोधकांकडून सभात्याग :
ADVERTISEMENT
मंत्री विजयकुमार गावित यांच्या उत्तरावर काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी दिलेले उत्तर असंवेदनशील असून आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचेही त्यांनी सांगितले.तर आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधित उत्तर पटलावरून काढण्याची मागणी केली. यानंतर मंत्री विजयकुमार गावित यांनी प्रत्युत्तर दिले. ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची असून फक्त अदिवासी विभागाची नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत, मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते. मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. तसेच सभात्याग करत असल्याचेही सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT