भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना एकमेकांविरोधात प्रचंड आक्रमक, 'त्या' पदासाठी आमने-सामने
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजतात बदलापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष हे आमने-सामने आले आहेत.
ADVERTISEMENT

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुका जाहीर होताच स्थानिक राजकारणात चांगलाच राजकीय तापमान वाढले आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होणार का? या चर्चेला आता अधिकच उधाण आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेची सत्ता असून, या वेळी मात्र भाजप आणि शिवसेना युतीबाबत अजूनही निर्णय झाले नाही.
भाजप-शिवसेनेची युतीवरून आरोप-प्रत्यारोप
दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांवर युती संदर्भात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. बदलापूर भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे म्हणाले की, 'आम्ही युतीसाठी इच्छुक आहोत', मात्र शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजप आमदारांना थेट ओपन चॅलेंज देत म्हटले आहे की, 'बदलापूरात आम्ही एकहाती सत्ता आणू शकतो.' भाजपकडून युतीचे संकेत दिले जात असताना शिंदे गटाकडूनही लवचीक भूमिका घेतली गेली तर, दोन्ही पक्षांमध्ये मनोमिलन होणार का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
हे ही वाचा>> '...तर शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू', खासदार नारायण राणे आक्रमक, कोकणचं गणित मांडलं
यासंदर्भात बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर आरोप करत म्हणाले की, 'भाजपा आणि शिवसेना हे मित्र पक्ष बदलापूर नगरपालिकेत 2005 वगळता कधीही एकत्र निवडणूक लढवली नाही, त्यांच्याकडे तसेच शिवसेनेमध्येही भरपूर पदाधिकारी आहेत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. इच्छा असताना तरीसुद्धा युतीच्या प्रस्ताव स्वतः मी माजी मंत्री कपिल पाटील यांच्याकडे ठेवला होता त्यानंतर कपिल पाटील यांनी मला बोलवून चर्चा केली.'
युतीच्या फार्म्युला ठरलेला होता त्या अगोदरच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेऊन अजित पवार गटाचे आशिष दामले यांच्या जागा जाहीर करत कामाला लागायचा आदेश दिला.










