'या केसमध्ये पार्थ पवार दोषी आहेत की नाही?', थेट प्रश्न.. पण अजित पवारांचं 'हे' उत्तर म्हणजे...
पुण्यातील जमीन प्रकरणात पार्थ पवार हे सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला. पाहा त्यावर अजित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी वाढतच आहे. तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणी अजित पवारांना पुढे येऊन उत्तरं द्यावी लागत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधून पुन्हा एकदा पुणे जमीन प्रकरणी त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं. दरम्यान, याचवेळी पत्रकार परिषदेत अजित पवारांना थेट असा सवाल विचारण्यात आला की, अजितदादा तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही?
दरम्यान, या प्रश्नावर अजित पवारांनी कोणत्याही प्रकारे थेट उत्तर दिलं नाही. अत्यंत तोलूनमापून आणि प्रश्नाला फाटा देत त्यांनी उत्तर दिलं. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.
प्रश्न: अजितदादा तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही?
अजित पवार: 'काही वेळा आम्ही जे व्यवहार करतो त्यामध्ये जे टॉपचे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो.. ते सर्च करायला सांगतो. त्यांनी ते तपासलं आणि त्यांनी सांगितलं की, ही जमीन तुम्ही घेऊ शकता. तर आपण पुढे पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी.. कधी-कधी नोटीस पण देतात. या जमिनीच्या संदर्भात आक्षेप आहे वैगरे, वैगरे... असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथे केल्या गेल्या नाहीत. तशा कुठल्याच गोष्टी इथे केल्या गेल्या नाहीत.' असं भलतंच उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं.
पत्रकार परिषदेत अजित पवार नेमंक काय-काय म्हणाले?
'आता यामध्ये जी काही चौकशी नियमाने करायची असते ज्या खात्याने.. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला देखील. दोन FIR वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले. त्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्याने पण काही चुका केल्या आहेत. आपलं अंडी उबवण केंद्र आहे ना बोपोडीचं तिथेही असंच काही केलं आहे. काल काही तरी तिथे छापाही पडला होता नोंदणी कार्यालयाच्या इथे.'










