Mumbai Local सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कधी सुरू होणार? हा प्रश्न कायम आहे. गुरूवारीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडा संयम बाळगा. संपूर्ण काळजी घेऊन मुंबई लोकलबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता आज आदित्य ठाकरे यांनी लोकल कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कोरोनाचे निर्बंध शिथील करत असाना […]
ADVERTISEMENT
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कधी सुरू होणार? हा प्रश्न कायम आहे. गुरूवारीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडा संयम बाळगा. संपूर्ण काळजी घेऊन मुंबई लोकलबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता आज आदित्य ठाकरे यांनी लोकल कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कोरोनाचे निर्बंध शिथील करत असाना काही बाबतीत जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांमध्ये लसीकरण बऱ्याच प्रमाणात झालं आहे. तरीही तिथे कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. राज्य सरकार सामान्य माणसाच्या जिवाची काळजी घेतं आहे हे विसरू नका. लोकल कधी सुरू करायची आहे याबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल ट्रेनमध्येच नाही तर इतर ठिकाणीही कशी सूट देता येईल यावरही चर्चा सुरू आहे.’ असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची भीती यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध होतेच. मंगळवारपासून राज्यातल्या २२ हून जास्त जिल्ह्यांमध्ये सूट देण्यात आली. त्यानंतर आता सामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला जातो आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं आहे. आज घडीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्याचा फटका मुंबईच्या अर्थचक्राला आणि सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. अनेक छोटे, मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत.
हे वाचलं का?
ज्यांच्या नोकऱ्या आहेत आणि वर्क फ्रॉम होम शक्य नाही त्यांना ऑफिसपर्यंत पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सरकारने आता जास्त वाट न बघता, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी होते आहे. भाजपने यासाठी आंदोलनही सुरू केलं आहे. अशात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई लोकल कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT