रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि Omicron चा रिपोर्ट आला, कल्याण मधील प्रकार
कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी नायजेरिया वरून आलेल्या एका परिवाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या रुग्णांवर महापालिकेच्या विलागिकरण कक्षात उपचार करण्यात आले. यावेळी रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर त्याचा omicron चा अहवाल आल्यामुळे सर्वत्र चर्चा होते आहे मिळालेल्या माहितीनुसार, दोन डिसेंबर रोजी चार जणांच एक कुटुंब कल्याण मध्ये आल्याची बातमी महापालिकेच्या […]
ADVERTISEMENT
कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी नायजेरिया वरून आलेल्या एका परिवाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या रुग्णांवर महापालिकेच्या विलागिकरण कक्षात उपचार करण्यात आले. यावेळी रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर त्याचा omicron चा अहवाल आल्यामुळे सर्वत्र चर्चा होते आहे
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, दोन डिसेंबर रोजी चार जणांच एक कुटुंब कल्याण मध्ये आल्याची बातमी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या चारही जणांची RTPCR चाचणी करण्यात आली. ज्याचा अहवाल ३ डिसेंबर ला आला, त्यात चौघांनाही कारोनाची लागण झाल्याचं कळलं. यापैकी पती आणि पत्नीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर या जोडप्याला १० वर्षांचा एक मुलगा आणि सहा वर्षांची एक मुलगी आहे
या कुटुंबाला कल्याण येथील महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवून उपचार सुरू करण्यात आले. या चारही जणांचे नमुने जिनोम सिकवेन्सिंग साठी पाठवण्यात आले. दरम्यानच्या काळात या कुटुंबातील चारही जणांचा अहवाल विलगीकरण कक्षात उपचारानंतर निगेटिव्ह आला. ज्यामुळे या कुटुंबाला आज डिस्चार्ज देण्यात आला. हे कुटुंब घरी गेल्यानंतर या परिवारातील पुरुषाचा omicron चा रिपोर्ट सकारात्मक आल्यामुळे सर्वत्र चर्चा होते आहे.
हे वाचलं का?
दरम्यान या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लो आणि हाय रिस्क अशा ८६ जणांशी पालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्क साधला असून यापैकी चार जणांचा RTPCR अहवाल सकारात्मक आला आहे. या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. पालिका प्रशासनाने या घटनेनंतर नागरिकांना घाबरून न जाता सर्व नियमांच पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT