Shiv Sena: सरनाईकांनंतर शिवसेनेच्या आणखी एका दिग्गज नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेस आमदाराची तक्रार
वसंत मोरे, बारामती शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा लेटरबॉम्बमुळे शिवसेनेसह संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या गोष्टीला आठवडा उलटत नाही तोच आता शिवसेनेच्या एका माजी मंत्र्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहलं असून ज्यामध्ये थेट काँग्रेस (Congress) आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी राज्यमंत्री आणि […]
ADVERTISEMENT
वसंत मोरे, बारामती
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा लेटरबॉम्बमुळे शिवसेनेसह संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या गोष्टीला आठवडा उलटत नाही तोच आता शिवसेनेच्या एका माजी मंत्र्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहलं असून ज्यामध्ये थेट काँग्रेस (Congress) आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काँग्रेसचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘गुंजवणी प्रकल्पाच्या बंद जलवाहिनी कामाला ज्यांनी प्रचंड विरोध केला, अडथळे आणले त्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ भावा ही केवळ शोकांतिका आहे. असं म्हणत विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे आमदारावर टीका केली आहे.
हे वाचलं का?
Pratap Sarnaik: रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक… कोण आहेत आमदार प्रताप सरनाईक?
शिवतारे यांनी या योजनेच्या शुभारंभासाठी आपली वेळ मिळावी, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. मात्र, त्याचवेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्यावर या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
राज्यमंत्रीपदाच्या काळात मोठ्या मेहनतीने मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या बंद जलवाहिनीच्या कामालाही मागील वर्षी सुरवात केली.
भोर आणि वेल्ह्यात जलवाहिनीचे काम चालू आहे. परंतु लवकरात लवकर योजना पूर्ण करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाशी समन्वय साधत काही दिवसांपूर्वी मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरवात केली आहे.
BJP शी जुळवून घ्या सांगणाऱ्या प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरेंचा संदेश
मात्र या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे. तोंडल (ता.पुरंदर) येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते. वास्तविक बंद जलवाहिनीद्वारे 100% सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असून तो सबंध देशाला नवी दिशा देणारा आहे. त्यासाठी तब्बल 1313 कोटी रुपयांना मी मंजुरी मिळवली होती.
हरित लवाद, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग अशा अनेक ठिकाणी सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. सुदैवाने मी या सगळ्या अडथळ्यांना पुरून उरलो आणि आज जलवाहिनीचे काम वेगाने सुरु आहे.
तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार बंद जलवाहिनीचा हा प्रकल्प पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी सबंध देशभरात यापुढे कालव्याने पाणी देण्याची पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरण स्वीकारले. ज्यांनी प्रकल्प होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या हस्ते अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्याइतकी शोकांतिका कुठलीच असू शकत नाही.
सबब या कामाचा शुभारंभ आपल्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हावा अशी माझी इच्छा आहे. कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ झाला तरी चालेल. आपणास विनंती आहे की याकामी आपल्याकडून वेळ मिळावी असे पत्रात नमूद केले आहे.
Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं ‘ते’ खळबळजनक पत्र जसंच्या तसं…
दरम्यान, आता या पत्रानंतर महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT