Maharashtra Sadan घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्या सत्र न्यायालयात आमदार आणि खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश एच.एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

न्यायाधीश सातभाई यांच्याकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रिमांड अॅप्लिकेशन, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा जामीनअर्ज आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा अर्ज सुनावणीसाठी आला होता. काही दिवसांपूर्वीच सातभाई यांनी मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष मुक्तता केली होती. यावेळी सातभाई यांनी अँटी करप्शन ब्युरोला आपलं काम व्यवस्थितपणे न केल्याबद्दल झापलं होतं.

सातभाई यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारण सांगण्यात येत असून मुंबई उच्च न्यायालयाचे Register general एम. एच. चंदवानी यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. विशेष न्यायाधिशांच्या बदलीसाठी हायकोर्टाच्या रजिस्टारला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. १३ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने सातभाई यांच्या बदलीला मान्यता दिल्याचं कळतंय. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायाधिशांची बदली आपल्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये असे आदेश दिले होते.

हे वाचलं का?

न्यायाधीश एच. एस. सातभाई मनी लाँड्रिंग कायद्यातर्गत विशेष न्यायालयाचे कामकाज पाहत असतानाच तसेच देशमुख, अडसुळ, खडसे यांच्यासह अन्य महत्वाची प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना अचानक झालेल्या बदलीमुळे न्यायालयीन वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT