सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या आतल्या गोटातली बातमी! उद्धव ठाकरेंचा प्लान बी ठरला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठाने शिंदे गटाला दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घेण्यासंबंधीसाठीचा निकाल घटनापीठाने देणं हा झटका मानला जातो आहे. अशात या सगळ्या घडामोडी घडत असताना मातोश्रीवर काय घडलं? शिवसेना पुढे काय करू शकते यासंदर्भातली एक बातमी समोर आली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत घटनापीठाची सुनावणी पुढे गेली आहे. राज्यपालांचे अधिकार, १६ आमदारांच्या निलंबनासंदर्भातली याचिका, राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन या सगळ्याची सुनावणी १ नोव्हेंबरला होणार आहे.

ADVERTISEMENT

मंगळवारी काय घडलं?

मंगळवारी घटनापीठाने हा निर्णय दिला की शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर खलबतं पार पडली. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? हा पेच आता निवडणूक आयोगाच्या दारात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनसमोर हा पेच गेला तर तिथला निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

निवडणूक आयोग काय निर्णय देऊ शकतं? काय आहेत तीन शक्यता?

१) शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहणार

२) शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे येणार

ADVERTISEMENT

३) शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवलं जाणार

ADVERTISEMENT

या तीन शक्यता आहेत. यापैकी एक निकाल निवडणूक आयोग देऊ शकतं. या तीन शक्यतांपैकी दोन शक्यता या शिंदे गटाच्या बाजूने जाणाऱ्या आहेत. पहिली शक्यता म्हणजे चिन्ह मिळण्याची तर दुसरी शक्यता आहे ती चिन्ह गोठवलं जाण्याची. दोन्ही परिस्थितींमध्ये शिंदे गटाला फायदा होऊ शकतो. चिन्ह उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना मिळालं तर एकनाथ शिंदे यांचा खरी शिवसेना हा दावा खरा ठरेल. तर चिन्ह गोठवलं गेलं तर शिवसेना कुणाची असा जो पेच आत्ता निर्माण झाला आहे ते संभ्रमाचं वातावरण कायम राहू शकतं. पक्ष बांधणींसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कसोशीने प्रयत्न करत आहेत. तसेच प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सुरू आहेत.

पहिली निवडणूक समजून निवडणूक लढा

धनुष्यबाण हे चिन्ह जर उद्धव ठाकरेंकडून गेलं तर काय करायचं? याची चाचपणी उद्धव ठाकरेंकडून सुरू झाली आहे. आपण आपली ही पहिली निवडणूक आहे असं समजून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. शिवसेनेने त्यांची पहिली निवडणूक त्यांच्याकडे चिन्ह नसताना युतीसोबत लढवली होती. प्रजा समाजवादी पक्षासोबत १९६७ ला शिवसेनेने युती केली होती. शिवसेनेसोबत युती करून प्रजा समाजवादी पक्षाने निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे तेव्हा ४२ नगरसेवक निवडून आले होते. अशाच प्रकारे पहिली निवडणूक समजून लढा यात गर्भित अर्थ लपलेला होता.

एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. म्हणजेच काय? तर ज्यांचा पक्ष आहे तेच प्रमुख राहतील. मात्र शिवसेना कुणा एका कुटुंबाची नाही. ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे असं सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत. खरी शिवसेना आमचीच आहे असंही सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा आणि बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे यांनीही शिंदे गटाच्या बाजूने सुप्रीम कोर्टात लढा दिला. या सगळ्या गोष्टी हे ध्वनित करत आहेत की एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख असतील. ठाकरे आडनाव हटवून दुसरा कुणीतरी शिवसेना प्रमुख होऊ शकतो असं दाखवत आहेत.

एकनाथ शिंदे यांना काय हवं आहे?

एकनाथ शिंदे शिवसेना काबीज करायची आहे. तसंच त्यांना चिन्हही हवं आहे. पक्षचिन्ह गोठावं असं त्यांना मुळीच वाटत नाही. ठाकरे घराण्याशिवाय एखादा माणूस शिवसेना प्रमुख होऊ शकतो असं एकनाथ शिंदे हे दाखवून देत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हीच पुढे घेऊन चाललो आहोत असंही कायम एकनाथ शिंदे सांगत आहेत. अशात आता उद्धव ठाकरे हे प्लान बी आखत आहेत.

उद्धव ठाकरेंचा प्लान बी काय असू शकतो?

शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं किंवा एकनाथ शिंदेंकडे गेलं तर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा झटका बसू शकतो. अशात नव्या पक्षचिन्हासह लढण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे अशी माहिती मातोश्रीच्या सूत्रांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT