ठाकरेंच्या टिकेपूर्वीच कदमांनी केली प्रत्युत्तराची तयारी; सभेची तारीख जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेतील इतर नेत्यांवर तोंडसुख घेण्याची शक्यता आहे. मात्र या सभेपूर्वीच रामदास कदम यांनी ठाकरेंना प्रत्यूत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. (After uddhav thackeray’s rally shivsena leader ramdas kadam will also get rally in khed)

ADVERTISEMENT

काय म्हणाले रामदास कदम :

खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही असेल. यात तसुभराचीही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे येत आहेत म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांमधून लोकं आणण्याची प्रचंड तयारी सुरु आहे. जणू काही खेडमध्ये शिवाजी पार्क मैदानावरील दसऱ्याची जाहीर सभाच आहे. म्हणजे रामदास कदम यांचा किती मोठा धसका घेतला आहे, हे यावरुन स्पष्ट होतं.

Sanjay Jadhav : आदित्य ठाकरेंमुळे शिंदेंचं बंड?, जाधवांनी ठाकरेंना दिला घरचा आहेर

हे वाचलं का?

आहो, बाहेरची लोकं आणून इथं राजकारण होतं असतं ना. ते येतील भाषण करतील, ऐकतील आणि निघून जातील. इथले स्थानिक किती आहेत? दोन ते चार टक्के तरी आहेत का? त्यामुळे मला त्याची काही काळजी नाही. त्यांनी याव, बोलावं, जावं, काय आम्ही त्याची दखल घेत नाही. पण त्याच मैदानावर आम्ही त्यांना १९ तारखेला प्रत्युत्तर देणार आहे. या सभेला एकनाथ शिंदे आहेत. गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आहेत. याच ठिकाणी त्यांना व्याजासहीत सगळी उत्तर मिळतील, असा इशाराही यावेळी कदम यांनी दिला.

आमदार होताच धंगेकरांचे फडणवीसांना खडेबोल! हेमंत रासने भडकले, म्हणाले…

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची सभा :

एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टीका करत आता फैसला जनतेच्या न्यायालयात होईल, अशी घोषणा केली होती. तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. याशिवाय निवडणूक आयोग म्हणजे ‘चुनाव आयोग’ नव्हे तर ‘चुना लावणारा आयोग’ अशी घणाघाती टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे कोणत्या शब्दांत शिंदे आणि भाजपवर टीका करतात याची उत्सुकता लागली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT